शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये दिग्गज पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:17 IST

gram panchayat Elecation Kolhapur- गडहिंग्लज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींसह ३ जिल्हा परिषद सदस्य आणि ५ पंचायत समिती सदस्यांच्या गावात ग्रामपंचायतीचे मैदान रंगणार आहे. एकूण ५ पैकी ३ जि. प. सदस्यांच्या तर एकूण १० पैकी ५ पं. स. सदस्यांच्या गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात दिग्गज पदाधिकारी व सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये दिग्गज पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला..!जि. प. उपाध्यक्षांसह सभापती-उपसभापतींच्या गावात ग्रामपंचायतीचे मैदान

राम मगदूम

 गडहिंग्लज- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींसह ३ जिल्हा परिषद सदस्य आणि ५ पंचायत समिती सदस्यांच्या गावात ग्रामपंचायतीचे मैदान रंगणार आहे. एकूण ५ पैकी ३ जि. प. सदस्यांच्या तर एकूण १० पैकी ५ पं. स. सदस्यांच्या गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात दिग्गज पदाधिकारी व सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या गिजवणे, जि. प. सदस्या रेखाताई हत्तरकी यांच्या हलकर्णी तर अनिता चौगुले यांच्या औरनाळ गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. पंचायत समितीच्या सभापती रूपाली गौतम कांबळे यांचे सासर तेरणी आणि माहेर हरळी बुद्रूक तर उपसभापती ईराप्पा हसुरी यांच्या खणदाळ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.माजी सभापती जयश्री तेली यांच्या हसूरचंपूची, माजी उपसभापती बनश्री चौगुले यांच्या माद्याळची व पंचायत समिती सदस्या इंदू नाईक यांच्या हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.जिल्हा परिषद सदस्य, मतदारसंघ आणि मतदारसंघातील निवडणूक लागलेली गावांची संख्या कंसात जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील - गिजवणे (७), हेमंत कोलेकर - नेसरी (१३), राणी खमलेट्टी - भडगाव (७), रेखाताई हत्तरकी - हलकर्णी (१३), अनिता चौगुले- बड्याचीवाडी (१०)पंचायत समिती सदस्य व त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक लागलेली गावांची संख्या कंसातविठ्ठल पाटील - कडगाव (३), प्रकाश पाटील - गिजवणे (४), विजय पाटील - महागाव (४), श्रीया कोणकेरी - भडगाव (३), जयश्री तेली - बड्याचीवाडी (५), बनश्री चौगुले - नूल (५), विद्याधर गुरबे - नेसरी (३), इंदू नाईक - बुगडीकट्टी (१०), रूपाली कांबळे - हलकर्णी (९), ईराप्पा हसुरी - बसर्गे (४)कोलेकर-हत्तरकींची कसोटीजि. प. सदस्य हेमंत कोलेकर यांच्या नेसरी मतदारंसघातील १३ व रेखाताई हत्तरकी यांच्या हलकर्णी मतदारसंघातील १३ गावची निवडणूक लागली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक