शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

म्हैसाळच्या गर्भपात केंद्रावर पुन्हा छापा

By admin | Updated: March 7, 2017 00:05 IST

औषधे, इंजेक्शन्स, कागदपत्रे जप्त; खिद्रापुरेचा आठ वर्षांपासून गर्भपाताचा उद्योग; दोन साथीदार ताब्यात

सांगली/मिरज/म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे गेली आठ वर्षे बेकायदा गर्भपाताचा उद्योग करीत असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. पोलिस व वैद्यकीय समिती यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकून गर्भपात तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे, इंजेक्शन्स व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. गर्भपाताच्या या ‘रॅकेट’मध्ये काही डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गेल्या आठवड्यात खिद्रापुरे याने गर्भपात केला होता; पण या शस्त्रक्रियेदरम्यान स्वातीचा मृत्यू झाला होता. याचा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर खिद्रापुरेचे कारनामे चव्हाट्यावर आले. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळमध्ये ओढ्यालगत पुरल्याचे स्पष्ट झाले. रविवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने खुदाई केली, त्यावेळी १९ भ्रूण सापडले होते. सोमवारी दुपारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील वैद्यकीय समिती यांच्या संयुक्त पथकाने या रुग्णालयावर छापा टाकून तेथील कागदपत्रे व औषधांची तपासणी केली. यामध्ये खिद्रापुरे २००९ पासून महिलांचा गर्भपात करण्याचा उद्योग करीत होता, असे पुरावे मिळाले आहेत. काही डॉक्टरांचाही या रॅकेटमध्ये सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. त्यांची नावे शोधण्याचे काम सुरू आहे. खिद्रापुरे पत्नीसह फरारी झाला आहे. त्यांच्या शोधासाठी चार पथके विविध भागात रवाना केली आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व समितीने संयुक्तपणे रुग्णालयावर छापा टाकला. यावेळी रूग्णालयात तळघरात व पहिल्या मजल्यावर दोन सुसज्ज शस्त्रक्रियागृहे, क्ष-किरण यंत्र, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषधे, इंजेक्शन्स, भुलीच्या औषधांचा साठा यासह तळघरात एक हौद आढळला. रूग्णालयातील कागदपत्रे व संगणक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. (प्रतिनिधी) चौकशीची मागणीभाजप महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर, सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे, शिवसेनेच्या सुनीता मोरे, सुवर्णा मोहिते यांनी म्हैसाळ येथे भेट देऊन, आरोपी डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाचेही पाठबळम्हैसाळसारख्या गावामध्ये डॉ. खिद्रापुरे टोलेजंग रुग्णालय बांधू शकतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या प्रकरणाला आरोग्य विभागाचे पाठबळ असल्याशिवाय असे प्रकार चालू शकत नाहीत. पोलिस प्रशासनाने येत्या चोवीस तासात फरारी डॉक्टरला अटक करू न त्याच्यावर कडक कारवाई करावी. - अ‍ॅड. वर्षा देशपांडेपत्नीचाही सहभागअवैध व्यवसायातून मिळालेली संपत्ती व राजकीय पाठबळाच्या जोरावर खिद्रापुरेने अनेक तक्रारी मिटविल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. डॉ. खिद्रापुरे याची पत्नी होमिओपॅथी डॉक्टर असून, पतीच्या गैरहजेरीत तीसुध्दा गर्भपात करीत असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर दांपत्य अद्याप फरारी आहे.