शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रादेशिक आराखड्याबाबत ‘नगररचना’ कडून अहवाल

By admin | Updated: July 8, 2017 18:47 IST

शासनाचे आदेश : चंद्रदीप नरके यांचा पाठपुरावा

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ८ : कोल्हापूर प्रादेशिक योजनेसंदर्भात असलेल्या त्रुटीसंदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश नगररचना विभागाचे अवर सचिव रा.म.पवार यांनी नगर रचना विभागाच्या संचालकांना दिले आहेत. आमदार चंद्रदीप नरकेंसह जिल्"ातील इतर आमदारांनी पालकमंत्री व मुख्यमंत्री यांना २९ मार्च २०१७ला निवेदन देऊन हरकत घेतली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असून, अवर सचिवांनी संचालक नगररचना यांना हरकतींबाबत मुद्देनिहाय अभिप्राय असलेला अहवाल शासनाला सादर करा, असे आदेश दिले आहेत.आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.जिल्"ातील विविध असोसिएशन व जनतेने या संदर्भात ५००० च्यावर हरकती नोंदविल्या आहेत. त्याबाबत आमदार नरके यांनी शासनापुढे विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या, वसाहती या २० ते २०० वर्षांपासून अस्तित्वात असताना प्रादेशिक योजनेमध्ये दखल न घेता बेकायदेशीर ठरविल्या जात असल्याचे स्पष्ट करून गावठाण क्षेत्रापासून लोकसंख्येवर आधारित ७५० ते १००० मीटर परीघ क्षेत्रापर्यंतच रहिवास विकसनासाठी परवानगी असताना ३० टक्के प्रीमियमचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसणार असल्याची तांत्रिकदृष्ट्या मांडणी केली आहे. यामुळे पडीक शेतजमिनीवरही शेतकरी विकसन करू शकणार नाही. कारण ३० टक्केप्रीमियम हा शेवटी शेतकऱ्यांच्या खिशावर येणार असल्याने ही बाब शासनाने गंभीरपणे घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. परंतू त्यामध्ये हा अहवाल किती दिवसांत द्यावा अशा स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत.