शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

काळे धंदे कळवा.. बक्षीस मिळवा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 22:05 IST

नेसरी : हिंदू धर्मामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु तो आनंदी व समाधानपूर्वक पार पाडण्यासाठी पोलिसांना जनतेची साथ हवी.

ठळक मुद्दे♦रिजवाना नदाफ यांचे आवाहन ♦डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करा♦भूमिकेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

नेसरी : हिंदू धर्मामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु तो आनंदी व समाधानपूर्वक पार पाडण्यासाठी पोलिसांना जनतेची साथ हवी. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याबरोबरच नेसरीसह पोलीस ठाण्याच्या २६ गावांतील अवैध धंदे बंद करण्याची मोहीम सहायक पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी सुरू केली आहे.कोणत्याही नागरिकांनी गावामध्ये काळे धंदे सुरू असल्याचे कळविल्यास पोलीस ठाण्यामध्ये नाव गुप्त ठेवून त्यांना बक्षीस दिले जाईल, अशी माहिती देत नदाफ यांनी ‘काळे धंदे कळवा...बक्षीस मिळवा’ असे आवाहन पोलिस ठाण्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी बोलाविलेल्या विविध गणेश मंडळे व पोलीसपाटील यांच्या संयुक्त बैठकीत केले.नदाफ म्हणाल्या, गणेश मंडळानी डॉल्बी बॉक्सवर खर्च करण्यापेक्षा चांगले कार्यक्रम राबवावेत. रात्री १० पर्यंतच स्पीकर चालू ठेवा. विनाकारण डॉल्बी लावल्यास त्या मंडळांच्या सर्व सदस्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही नदाफ यांनी दिला. यावेळी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली.बैठकीस सुरेश तुपूरवाडकर, शिवाजी पाटील, उत्तम नाईक, गंगाराम डोंगरे, प्रमोद नांदवडेकर, अभय जाधव, अभिजित पाटील, संगाप्पा साखरे, कृष्णा पाटील, संजय वार्इंगडे, सचिन कदम, जोतिबा कोलेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.अवैध धंदे रोखण्यासाठी उपाययोजनारिजवाना नदाफ या नेसरी पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी स.पो.नि. म्हणून रुजू झाल्या. येथील कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नेसरीसह भागातील विविध गावांमध्ये अवैध धंदे बंद करण्यासाठी परिस्थितीचा अंदाज घेत प्रत्येक गावच्या पोलीसपाटलांना आवाहन केले होते. तसेच त्यांना सज्जड इशाराही दिला होता. आता थेट नागरिकांनाच काळे धंदे कळविण्याचे आवाहन केल्याने परिसरातील काळे धंदेवाल्यांची भंबेरी उडाली आहे. काळ्या धंद्यांवर टाच आणणाºया अधिकारी नदाफ यांच्या भूमिकेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.