शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील जमिनी सरासरी रेकनरच्या कक्षेत आणा

By admin | Updated: February 20, 2016 00:43 IST

आरक्षणबाधित शेतकरी : मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : महापालिका मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार टी. डी. आर. वापराच्या नवीन धोरणातील सूत्राने कोल्हापूर शहरातील शेतकऱ्यांच्या आरक्षित जमिनी कवडीमोल ठरणार आहेत. यासाठी या जमिनी सरासरी रेकनर दराच्या कक्षेत आणाव्यात, अशी मागणी शहरातील आरक्षणबाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शासनाच्या २८ जानेवारी २०१६ च्या अधिसूचनेतील टी.डी.आर. वापर सूत्र धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शहरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या आरक्षित जमिनी कवडीमोल ठरणार आहेत. प्रतिचौरस फूट १८ ते ५० रुपये इतका कमी दर आहे. याउलट टी.डी.आर. ज्या ठिकाणी वापरता येतो, अशा जागेचा दर २५० ते ३५०० रुपये प्रतिचौरस असल्याने नवीन वापरात येणाऱ्या टी.डी.आर. धोरणाच्या सूत्राने तो कित्येक पटींत द्यावा लागेल. यामुळे टी.डी.आर. खरेदी-विक्री तथा वापर व्यावहारिक होणार नाही. यामुळे आरक्षित जमीनमालकांना त्याचा त्रास होणार आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यभर दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नवीन धोरणामुळे शेतकरी भूमिहीन होत असताना त्याच्या जमिनीचा त्याला योग्य मोबदला मिळणार नसेल तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. टी.डी.आर. धोरणामुळे ज्या मोजक्या आरक्षित जागा, ज्यांचा रेकनर दर अधिक प्रमाणात आहे, अशा ठिकाणी निर्माण झालेल्या टी.डी.आर.ची मक्तेदारी निर्माण होईल. या दुप्पट व तिप्पट टी.डी.आर. देण्याच्या धोरणाचा काडीमात्र उपयोग न होता, ज्या जागेचा रेकनर दर अत्यल्प आहे, त्या जागेची काही किंमत होणार नाही. परिणामी, ही संकल्पनाच संपुष्टात येऊन शहराच्या विकासास खीळ बसणार आहे. यासाठी नवीन अधिसूचनेस किमान एक वर्षासाठी स्थगिती द्यावी, अशी मागणी जयवंत पाटील, सुरेश पाटील, स्नेहलकुमार पोवार, अनिल सरनाईक, अमृत कांबळे, अजित गायकवाड, शरद बेडेकर, विक्रम पाटील, संजय केंबळे, धनश्री यादव-पाटील, अर्जुन पारळे, आदी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)