शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राणेंना भांडवलदारांकडून आश्वासन : सुधीर सावंत

By admin | Updated: July 23, 2014 21:55 IST

काँग्रेसमधील दलालांनी किंवा भांडवलदारांनी दिले असेल,

वेंगुर्ले : नारायण राणे २००५ मध्ये काँग्रेसमध्ये जाताना त्यांना मुख्यमंत्री बनविण्याचे आश्वासन काँग्रेसच्या अध्यक्षा किंवा केंद्रातील नेत्यांनी दिले नव्हते. तर त्यांना काँग्रेसमधील दलालांनी किंवा भांडवलदारांनी दिले असेल, असे विधान शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष कर्नल सुधीर सावंत यांनी वेंगुर्ले येथे केले. सुधीर सावंत यांनी वेंगुर्ले येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवराज्य पक्षाचे जिल्हा संघटक दीनानाथ वेर्णेकर उपस्थित होते. सन २००३ मध्ये मी नारायण राणे हे काँग्रेसमध्ये येणार, असे सांगितले होते. त्यावेळी माझ्यावर हल्लाही झाला होता. काँग्रेसमधील दलालांनी व भांडवलदारांनी मला विरोध करण्यासाठी नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्याशिवाय एकही काँग्रेसचा आमदार निवडणुकीत निवडून आला नाही. मग राणे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे नाटक करून मुख्यमंत्रीपद कसे काय मागतात हे काँगे्रसलाच ठाऊक , असे सावंत म्हणाले. कोकणातील मतदारांनी काँगे्रसच्या विरोधात मत न टाकता राणे यांच्या विरोधातच टाकले आहे. यापुढच्या निवडणुकीत कोकणातील मतदार राणे व त्यांच्या मुलाच्या विरोधात मतदान करणार आहे. त्यामुळे शिवराज्य पक्षात येण्याची आॅफर आमदार दीपक केसरकर यांना दिली असल्याचे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)