सरपंच नारायण भोसले हे कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असतात. गावाच्या हिताचे काम करण्यास नेहमीच टाळाटाळ करीत आले आहेत. त्यांनी आपल्या सरपंच पदाचा गैरवापर करून आर.बी.एल. बँक कोल्हापूर शाखा रांगोळीमध्ये असलेल्या ग्रामपंचायत खात्यामधुन स्वतःच्या नावावर चेकने चार लाख ६६ हजार रुपये रक्कम काढून त्याचा परस्पर विनियोग स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आहे. शासनाच्या आदेशाला डावलून शासकीय गायरानात बेकायदेशीर अतिक्रमण करून तेथे बांधकामही केले आहे. गावातील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची असताना स्वतःच अतिक्रमण करून शासनाची दिशाभूल केली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन त्यांना सरपंच पदावरून त्वरित कार्यमुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सरपंच नारायण भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रामपंचायत निधीचा आपण एका पैशाचाही गैरवापर केलेला नाही. गावाची यात्रा साजरी करण्यासाठी जी काय लोकवर्गणी जमा होते, त्या लोकवर्गणीतुन खर्चाची बिले भागविली आहेत. मी अतिक्रमण केल्याचा जो आरोप होत आहे, त्याचीही जी काय चौकशी व्हायची ती होऊदे. चौकशी वेळी योग्य कागदपत्रांसह उत्तरे देण्यास मी समर्थ आहे.