शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निर्दोष संचालकांना गैरव्यवहारातून बाहेर काढा- रामचंद्र डांगे यांचा इशारा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:53 IST

येथील एस. के. पाटील बँकेच्या गैरव्यवहारास बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील व संचालक रामभाऊ मोहिमे हे तिघेच जबाबदार आहेत. डॉ. पाटील यांनी

ठळक मुद्देसंजय पाटील यांच्या घरासमोर संचालकांना घेऊन उपोषण करणार

कुरुंदवाड : येथील एस. के. पाटील बँकेच्या गैरव्यवहारास बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील व संचालक रामभाऊ मोहिमे हे तिघेच जबाबदार आहेत. डॉ. पाटील यांनी संचालकांना अंधारात ठेवून तंबाखू संघ, शेतीमाल प्रक्रिया, मयूर दूध संघांवर कर्ज टाकून १६ कोटी रुपये उचलले. या तिघाव्यतिरिक्त कोणत्याही संचालकाने एक रुपयाही घेतला नसल्याने यातून पाटील यांनी सर्व संचालकांना बाहेर काढावे. अन्यथा, बंगल्यासमोर निर्दोष असलेल्या सर्व संचालकांना घेऊन बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व बँकेचे संचालक रामचंद्र डांगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.यावेळी डांगे म्हणाले, संजय पाटील बँकेचे प्रमुख होते. त्यांनी अधिकाराचा गैरवापर करीत तंबाखू संघ, शेतीमाल प्रक्रिया संघ, मयूर दूध संघ, भाजीपाला संघ, मयूर वाहतूक संघ, अशा विविध संस्थांच्या नावे कर्ज टाकून सुमारे सोळा कोटी रुपये उचलले आहेत. बँकेच्या संचलकांची मिटिंग न घेता त्यांच्या घरी जाऊन सह्या घेऊन त्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सर्वच संचालकांवर या कर्जाची सामूहिक जबाबदारी पडली आहे. पाटील यांनी तंबाखू संघाचे पेट्रोल पंप, जमिनी आहेत त्या विकून कर्जे भागवून संचालकांची सुटका करावी. याबाबत सर्व संचालकांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगून निवेदन देणार आहे. संचालकांच्या आक्रमकतेमुळे एस. के. पाटील बँक पुन्हा चर्चेत आली आहे.संजय पाटील कोल्हापूर जिल्ह्याचा मल्ल्यासंजय पाटील यांनी विविध संस्थांच्या नावे कर्जे टाकून पूर्ण बँकच घशात घातली आहे. सामूहिक जबाबदारी म्हणून संचाकांवर कायदेशीर मालमत्तेच्या जप्तीच्या नोटिसा आल्या आहेत. मात्र, याची कोणतीही जाणीव पाटील यांना नसून, निवांतपणे ऐश आरामात फिरत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा हा मल्ल्याच असून, त्याची आता सुटका होऊ देणार नसल्याचेही डांगे यांनी सांगितले.ह्यलोकमतह्णचे वृत्त खरेह्यलोकमतह्णने संजय पाटील यांनी अपहाराची रक्कम त्वरित भरावी, उच्च न्यायालयाचे आदेश या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. पाटील यांनी दाखल केलेले ८८ कलम फेटाळल्याने संचालकांनी वसुलीच्या तगाद्यातून पाटील यांची डोकेदुखी वाढणार, असे संकेत दिले होते. वृत्त खरे ठरल्याने डांगे यांनी पत्रकार बैठकीत  लोकमतच्या बातमीचे कात्रण दाखवत वस्तुस्थिती असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँक