शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यात अडकलेल्या माकडांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद‌्भवल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. माणसांबरोबरच वन्यप्राण्यांनाही या पुराचा फटका बसला ...

कोल्हापूर : कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद‌्भवल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. माणसांबरोबरच वन्यप्राण्यांनाही या पुराचा फटका बसला होता. पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील नदीकाठी एका झाडावर सलग चार दिवस पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या सुमारे २५ ते ३० माकडांची वन्यजीव संक्रमण उपचार केंद्राच्या पथकाने सुरक्षितपणे सुटका केली.

वाघवें (ता. पन्हाळा) येथील नदीकाठी एका झाडावर गेल्या चार दिवसांपासून पुराच्या पाण्यात ही २५ ते ३० माकडे अडकली होती. अडकलेल्या दिवसापासून ती भुकेने व्याकुळ झाली होती. वाघवे येथील ग्रामस्थ दीपक पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागविली होती. वन खात्याच्या वन्यजीव संक्रमण उपचार केंद्राच्या स्वयंसेवकांनी पुराच्या पाण्यातून तब्बल साडेतीनशे फुटांचा प्रवास करून ही माकडे दोरखंडाच्या साहाय्याने वाघवे गावात सुरक्षितपणे उतरविली. त्यांना खाद्यपुरवठा केला.

मोहिमेत अनेकांचा सहभाग

या बचावकार्यात वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अक्षय कांबळे, वन्यजीव संक्रमणचे स्वयंसेवक अमित कुंभार, विकास पाटील, सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, जवान राज मोरे, सरदार कांबळे, महेश कांबळे, विनायक घुणके, कुमार पाटील, वैभव पाटील, युवराज विभुते, प्रकाश उदाळे, निखिल जाधव, विशाल सुतार, अमित कुंभार, अमोल पाडळे, पवन महाजन, रोहन पाटील, महादेव पानारी, अवधूत कुलकर्णी, संदेश पाटील तसेच वाघवे गावचे दीपक पाटील, संतोष विभुते, पोलीस पाटील गणेश पोवार, सरपंच प्रदीप पाटील, पांडुरंग पाटील, वनसेवक, विश्वनाथ पाटील, बावडा रेस्क्यू फ़ोर्सचे अक्षय निकम, नीलेश पिसाळ, दिगंबर घराळ, पन्हाळा वनपाल विजय दाते, वनरक्षक अमर माने, वन्यजीव संक्रमण उपचार केंद्र, कोल्हापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर, उपवनसंरक्षक कोल्हापूर आणि वनक्षेत्रपाल पन्हाळा, कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रसाद संकपाळ सहभागी झाले होते.

---------------------------------------------

(संदीप आडनाईक)

फोटो : 27072021-kol-Monkey Resque

फोटो ओळी : कोल्हापूर वनविभागाच्या वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राच्या स्वयंसेवकांनी वाघवे येथे पुराच्या पाण्यामुळे झाडावर अडकलेल्या माकडांची सुटका केली.