शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना दहशतवादी जाहीर करा

By admin | Updated: May 7, 2017 01:10 IST

पानसरे, दाभोलकर हत्या प्रकरण : भाकपची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना दहशतवादीच जाहीर करा अशी थेट मागणी शनिवारी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने नूतन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली. पक्षाचे राज्य सचिव नामदेव गावडे, स्मिता पानसरे, सतीशचंद्र कांबळे, आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही भेट घेतली. पानसरे यांची १६ फेबु्रवारी २०१५ ला भर दिवसा रस्त्यावर गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. सात महिन्यांनंतर संशयित मारेकरी समीर गायकवाड याला अटक करण्यात आली. मात्र, अद्यापही सूत्रधारापर्यंत व अन्य आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सनातन संस्थेच्या धार्मिक कार्याच्या बुरख्याआडून खुनी, हिंसक, अतिरेकी कारवाया करणाऱ्या या आरोपींना दहशतवादी व अतिरेकी जाहीर केले पाहिजे व त्या संस्थेवरही बंदी घातली पाहिजे. या संस्थेचे अनुयायी बॉम्बस्फोट, खून प्रकरणांमध्ये सापडत आहेत. यातील खरे सूत्रधार व इतर आरोपी याच संस्थेतील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संस्थेतील अनुयायींची माहिती पोलिसांकडे देणे सक्तीचे करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते. शिष्टमंडळात पक्षाचे कृष्णात जाधव, सम्राट मोरे, अनिल चव्हाण, बन्सी सातपुते, बी. एल. बरगे, दत्ता मोरे, धीरज कटारे, दिलदार मुजावर, आदींचा समावेश होता. आरोपींना अटक करूपोलीस अधीक्षक मोहिते म्हणाले,‘ या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. अन्य आरोपींच्या अटकेसाठी ‘एसआयटी’ व स्थानिक पोलीस सर्व शक्ती पणाला लावून काम करीत आहेत. तपास अधिकारी अतिरिक्त अधीक्षक दर्जाचाच राहणार आहे. तपासास गती देऊन या प्रकरणातील आरोपींना अटक करू.’