शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीतील तरतुदी शिथिल करा

By admin | Updated: July 11, 2017 01:03 IST

जीएसटीतील तरतुदी शिथिल करा

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : जीएसटी कर प्रणालीतील क्लिष्ट तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर पॉवरलूम क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘क्लिष्ट तरतुदी रद्द करा अथवा जीएसटी हटवा’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. येथील गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा आला. तेथे शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये कापड येत असल्याने यापूर्वी कापडावर कर लावण्यात आला नव्हता. आता जीएसटीमुळे कर लागल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांवर कपडे खरेदी करताना परिणाम होणार आहे. तसेच जीएसटी कर प्रणालीतील क्लिष्ट आणि जाचक अटींचा केलेला समावेश रद्द करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.मोर्चात येथील सायझिंग, प्रोसेसिंग, ट्रान्स्पोर्ट, अडते, क्लॉथ ब्रोकर्स असोसिएशन या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच उगमचंद गांधी, रामपाल भंडारी, अशोककुमार बाहेती, चंदनमल मंत्री, रामविलास मुंदडा, भीमकरण छापरवाल, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, लक्ष्मीकांत मर्दा, मिश्रीलाल जाजू, राजाराम चांडक, विनोद कांकाणी, राजाराम भुतडा, आदींसह शहरातील व्यापारी सहभागी झाले होते.तिसऱ्या दिवशीही बंद येथील कापड व्यापारी असोसिएशनने पाच दिवस व्यापारी पेढ्या बंदची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे शनिवार (दि. ८) पासून शहरातील सर्व व्यापारी पेढ्या बंद होत्या. सोमवारी तिसऱ्या दिवशीही बंदला प्रतिसाद मिळाला. परिणामी, करोडो रुपयांचे होणारे कापड खरेदी-विक्रीचे सौदे बंद होते. त्याचा परिणाम सूत व्यापाऱ्यांवर झाला.आंदोलनाची पुढील दिशा बुधवारी ठरविणारशासनाकडून संपाबाबत कोणकोणत्या हालचाली होतात ते पाहून त्यानुसार उद्या, बुधवारी सायंकाळी सर्वांची एकत्र बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर होणार आहे, असेही यावेळी स्पष्ट केले.