शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी योजनांच्या अटी शिथिल करा

By admin | Updated: March 14, 2016 23:51 IST

महिलादिनी पगारी सुटी द्या : १९व्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेत ठराव

कोल्हापूर : मेहनती, कष्टकरी महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदोपत्रांची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे गोरगरीब, निराधार, वयोवृद्ध, अपंग व विधवा कष्टकरी महिलांना या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने या महिलांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांच्या अटी शिथिल करा, महिला दिनाची पगारी सुटी जाहीर करावी, असे ठराव संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेमध्ये एकमताने संमत करण्यात आले.शाहू स्मारक भवन येथे सोमवारी महिला दिनानिमित्त १९ व्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषद झाली. याप्रसंगी देवराई संस्थेच्या अनुराधा सामंत यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी मेघा पानसरे, संतुलन महिला चळवळीच्या अ‍ॅड. पल्लवी रेगे, शिल्पा माजगावकर उपस्थित होत्या. पानसरे म्हणाल्या, आपल्याकडे महिलांवर खूप बंधने लादली गेली आहेत. त्यामुळे महिलांना आजही पाहिजे तितके स्वातंत्र्य मिळत नाही. महिलांनी शिकले पाहिजे, संघटित होऊन लढा दिला पाहिजे. खाण कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने खाणीतून जो महसूल मिळतो, त्यामधील दहा टक्के निधी हा खाण कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खर्च केला पाहिजे. या हक्कासाठी लढा उभारला पाहिजे. अनुराधा सामंत म्हणाल्या, महिला संघटित झाल्याने लढा देताना त्यांची ताकद वाढते. यासाठी शिका, संघटित व्हा व आपल्या हक्कांसाठी लढा द्या. अ‍ॅड. पल्लवी रेगे यांनी संस्थेची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांचा सत्कार झाला. कव्या जिंदाबाद या कॅलेंडरचे प्रकाशन झाले. संतुलन महिला पतसंस्थेच्या सचिव कमलताई पाबळे यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बी. एम. रेगे, मंगलताई जगताप, दीपाली पवार, अनिता नलवडे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा येथून खाण कामगार महिला व शेतकरी महिला उपस्थित होत्या. असे आहेत ठराव.....राज्यातील प्रत्येक पोलिस चौकी व पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच कोणत्याही पोलिस चौकी व पोलिस ठाण्यामध्ये महिलांची तक्रार नोंदविण्यासाठी, महिलांचा जबाब घेण्यासाठी अथवा महिलांची चौकशी करण्यासाठी केवळ महिला पोलिसच व महिला अधिकारीच असाव्यात.शासकीय भूखंडांवरील दगडखाणीचे परवाने दगडखाण कामगार, विधवा व परितक्त्या महिलांच्या सहकारी सोसायट्यांना देण्यात यावेत.असंघटित क्षेत्रातील कष्टकरी व शेतकरी महिलांच्या पेन्शनची वयोमर्यादा ४५ ते ५० पर्यंत करावी व पेन्शन त्वरित जाहीर करावे.राज्यातील सर्व रास्त भाव व केरोसीन दुकानांचे परवाने महिला बचत गटांनाच द्यावेत.मुली व महिलांना जातीचे दाखले देण्याची स्वतंत्र व गतिमान व्यवस्था निर्माण करावी.महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीयीकृत बँकातून शून्य टक्के व्याज दराने कर्ज मिळावे.शासकीय भूखंडांवरील अतिक्रमित कष्टकऱ्यांची घरे महिलांच्या नावे करून, संबंधित ग्रामपंचायतींनी त्यांची नोंद घेऊन त्यांना त्वरित ‘८ अ’ उतारे द्यावेत.मुलींसाठी बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करावे.