शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘कडकनाथ’च्या घोटाळ्यात सदाभाऊंचे नातेवाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:50 IST

कोल्हापूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली संस्थाही कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत ...

कोल्हापूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली संस्थाही कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित नातेवाइकाची असल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधितांवर कारवाई केली नाही तर त्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेत कडकनाथ कोंबड्या सोडू, असा इशाराही त्यांनी दिला.शेट्टी म्हणाले, सांगलीतील ज्या कंपनीने फसवणूक केली आहे, तिचा मालक हा राज्यमंत्री खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा अध्यक्ष आहे. कंपनीचे नावही ‘रयत’ यावरूनच दिले आहे.अलीकडेच संबंधित कंपनीच्या मोहिते नावाच्या मालकाचा विवाह खोत यांच्या पुतणीशी झाला आहे.याबाबत खोत यांनी अद्याप खुलासा केलेला नाही किंवा ते टाळूही शकत नाहीत.कृषी विभागाकडून या व्यवसायावर ५० टक्के अनुदान मिळवून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक झाली आहे. त्यामुळे या कंपनीला राजकीय आश्रय आहे. ज्या अर्थी पोलीस गुन्हे दाखल करून घेत नाहीत, त्या अर्थी राज्यमंत्री खोत यांचादबाव असल्याचे दिसते.पोलिसांनी तक्रारी दाखल करून घेतल्या नाहीत तर त्या ‘स्वाभिमानी’कडे द्याव्यात, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले.या फसव्या कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.राज्य बॅँक गैरव्यवहाराची सखोल चौकशी कराचराज्य बॅँकेतील गैरव्यवहारप्रकरणी सरकारने नेहमीच बोटचेपी भूमिका घेतली. ज्यांच्यावर आरोप आहेत, ते भाजप व शिवसेनेत गेले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्<रठॠ-दळर>ांचा तपास पोलिसांनी नि:पक्षपातीपणे करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करावे, असे शेट्टी यांनी सांगितले.... तर राजकीय संन्यास : सदाभाऊ खोतकोल्हापूर : ‘कडकनाथ’चा फसवणूक करणारा माझा जावई आहे, हा ‘जावईशोध’ राजू शेट्टी यांनी कधी लावला? फसवणूक करणारा जावई सोडाच पण जवळचा नातेवाईक जरी निघाला तरी आपण राजकीय संन्यास घेऊ. पण आरोप खोटा निघाला तर शेट्टी राजकीय संन्यास घेणार का? असा सवाल करत शेट्टींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.शेट्टी हे माझ्यासोबत २५ वर्षे होते, त्यांना माझे सर्व नातेवाईक माहिती असताना हा ‘जावईशोध’ कोठून लावला. मला मुलगी नाही, त्यात सख्खाभाऊही नाही. त्यामुळे माझा जावई असणे शक्यच नाही. माझ्या गावात ७० टक्के खोत आहेत. यापैकी कोणाची तरी मुलगी संबंधित फसवणूकदाराला दिली असेल, तर त्याचा संबंध माझ्याशी कसा? शेट्टी यांनी जावयाचे नाते शोधण्यासाठी माझी वंशावळ काढावी, जर त्यात माझा जावई निघाला तर आपण राजकीय संन्यास घेतो. नसेल तर शेट्टींनी संन्यास घ्यावा, असे राज्यमंत्री खोत यांनी सांगितले.