शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून ५० टक्क्यांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:32 IST

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ ...

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ लोटला असला, तरी १00 टक्केपुनर्वसन झालेले नाही. जमीन व भूखंडांसाठी पसंतीचे अर्ज देऊन १0-१0 वर्षे झाली, तरी शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांचे हात रितेच राहिले आहेत.राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाला २००१ मध्ये मंजुरी मिळून, त्याच्या कामाला सुरुवात झाली. अद्याप धरणाचे काम ७० टक्केच झाले असून, पुनर्वसन ६० टक्केझाले आहे. राई, पडसाळी, कंदलगाव ही गावे बाधित होऊन, येथील २४९ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राधानगरी तालुक्यातच राई व कंदलगाव प्रकल्पग्रस्त वसाहतींमध्ये झाले आहे. या वसाहती नुसत्या नावालाच आहेत. येथे वीज, पाणी, रस्ते अशा भौतिक व नागरी सुविधांची वानवा आहे. अजून ४० टक्केप्रकल्पग्रस्तांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. यातील अनेक जणांना जमीनच मिळालेली नाही. ज्यांनी जमीन मागणीसाठी पसंतीचे फॉर्म भरून दिले आहेत. त्यांना आठ-१0 वर्षे उलटली, तरी वाटच बघावी लागत आहे. आठ वर्षांपासून या प्रकल्पाशी संबंधित एकही आदेश निघालेला नाही. शासकीय यंत्रणेच्या समन्वयाचा अभाव व ढिसाळ कारभार, यामुळेच प्रकल्पग्रस्तांवर ही वेळ आली आहे.आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाला १९९६ मध्ये मंजुरी मिळून, प्रत्यक्ष कामाला १९९९ मध्ये सुुरुवात झाली. अद्याप ७५ टक्केकाम झाले असून, सांडवा आणि घळभरणीचे काम बाकी आहे. पुनर्वसन ५० टक्केच झाले आहे. येथील उचंगी, चाफवडे, जेऊर, चितळे ही गावे बाधित झाली असून, २८८ प्रकल्पग्रत पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच १00 टक्केपुनर्वसन व्हावे, अशी प्रकल्पग्रस्तांनी मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने करूनही प्रशासनावर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही.