शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परकीयांची नोंदणी सक्तीची

By admin | Updated: March 16, 2015 00:05 IST

मिरजेत आदेश : लॉज, रुग्णालय चालकांना सूचना

मिरज : जिल्ह्यात येणाऱ्या परकीय नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लॉज, रुग्णालय चालकांना त्यांच्याकडे येणाऱ्या परकीय नागरिकांची माहिती आॅनलाईन देण्याची सक्ती करण्यात आली आहे. मिरजेत अरबांसह परकीय नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने लॉज, रुग्णालयांतील खोल्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना पोलिसांनी शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.व्हिसा घेऊन भारतात येणाऱ्या परकीय नागरिकांनी जिल्ह्यात कोठेही वास्तव्य केल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना व पोलीस मुख्यालयातील स्थानिक अन्वेषण विभागाला देणे आवश्यक आहे. मात्र परकीय नागरिकांची नोंद ठेवण्याबाबत व माहिती देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने परकीय नागरिकांनी कोठे, किती दिवस वास्तव्य केले, याची नेमकी माहिती मिळत नाही. परकीय नागरिकांच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केंद्रीय गृह विभागाने संकेतस्थळ सुरु केले असून, परकीय नागरिक वास्तव्य करण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यावसायिकांना या संकेतस्थळावर नोंद करावी लागणार आहे. परकीय नागरिकांचे आगमन व त्यांच्या प्रस्थानाबाबत माहिती नोंदविल्यानंतर देशभरातील सुरक्षा संस्थांना परकीय नागरिकांच्या हालचालींची माहिती मिळणार आहे. परकीय नागरिकांची माहिती न देणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मिरजेत वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या अरब नागरिकांची संख्या मोठी आहे. मिरजेतील लॉजचालक, खासगी विश्रांतीगृहे, रुग्णालये चालकांना पोलिसांनी आॅनलाईन नोंदणी करण्याच्या व माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आॅनलाईन माहिती संकलनासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (वार्ताहर)परकीय नागरिक बेपत्ता होत असल्याने दक्षता मध्य पूर्व देशातील अस्थिरता, दहशतवादी संघटनांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर देशात येणाऱ्या परकीय नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून व्हिसाच्या मुदतीत त्यांना परत पाठविण्यासाठी त्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आगमन झालेले अनेक परकीय नागरिक बेपत्ता झाले असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.