शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात होणार पक्ष्यांची नोंदणी

By admin | Updated: June 5, 2015 00:20 IST

सह्याद्री निसर्ग मित्र : दहा पक्षीमित्रांची टीम

उत्तमकुमार जाधव-- चिपळूण  सह्याद्री निसर्गमित्र संस्थेतर्फे पक्ष्यांचा अभ्यास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २० जून रोजी सलीम अली यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. वर्षभर हा कार्यक्रम राबवला जाणार असून, शहरात दर १५ दिवसांनी १० पक्षीमित्रांची टीम सर्वेक्षण करुन त्याची नोंद ठेवणार आहे.सध्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, नव्या पिढीला पक्ष्यांची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने सह्याद्री निसर्गने हा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये ग्लोबल टुरिझम आॅफ चिपळूण, आरोही निसर्गमित्र, वनविभाग यांनीही सहभाग दर्शवला आहे. चिपळूण शहरात कुठल्या काळात कोणते पक्षी दिसू शकतात, याची माहिती या सर्वेक्षणातून मिळणार आहे. वर्षभराच्या अभ्यासानंतर याबाबतची पुस्तिका तयार करण्यात येणार असून, वेबसाईट, ब्लॉग, डीव्हीडी या स्वरुपात ही माहिती उपलब्ध होणार आहे.या उपक्रमात नवोदितांपासून तज्ज्ञ पक्षी निरीक्षक सहभागी करुन घेतले जाणार आहेत. या प्रकल्पाची जबाबदारी सह्याद्रीने घेतली आहे. तांत्रिक बाजूची जबाबदारी ऋतुजा खरे सांभाळणार आहेत. नवोदितांना हा अभ्यास कसा करावा, याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यासाठी पहिली कार्यशाळा १४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संस्थेच्या मार्कंडी येथील कार्यालयात होणार आहे. चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. चिपळुणातील पाणथळही नष्ट होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर येथील पक्ष्यांची काय स्थिती आहे. त्यांना कोणते धोके आहेत, हे पाहाणे गरजेचे आहे. याबाबत चौथ्या पक्षीमित्र संमेलनात हा अभ्यास करण्याची गरज ऋतुजा खरे यांनी बोलून दाखवली. भाऊ काटदरे व सर्व पक्षी मित्रांनी हे काम पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. याबाबत पहिली सभा झाली. यावेळी २५ सभासद उपस्थित होते. काटदरे, राम रेडीज, समीर कोवळे, रोहन लोवलेकर, सुभाष केळकर, भक्ती पेंडसे, नितीन नार्वेकर, प्राजक्ता ओक, अनिकेत बापट, खरे, अक्षय बापट यावेळी उपस्थित होते. पक्षी नोंदणीतून सध्या परिस्थिती समोर येईल. सह्याद्री निसर्गमित्रने यंदा दर पंधरा दिवसांनी केल्या जाणाऱ्या सर्व्हेक्षणाकडे शहरातील पक्षीमित्रांचे लक्ष लागले आहे. या उपक्रमात नवोदितांपासून तज्ज्ञ पक्षीनिरीक्षक सहभागी होणार आहेत. तांत्रिक बाजूने ही जबाबदारी खरे यांनी स्विकारल्याचे सांगण्यात आले. यानिमित्ताने पक्षीमित्रांना कोकणात पक्षी निरीक्षणाची संधी मिळाली असून, शहरातील पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. सह्याद्री निसर्ग मित्रने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. सह्याद्री निसर्गमित्र उलगडणार चिपळूणचे पक्षी वैभव.सलीम अली यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० पासून प्रारंभ.१५ दिवसांनी पक्षी मित्रांची टीम करणार सर्वेक्षण.वेबसाईट, ब्लॉग, डीव्हीडी स्वरुपातही माहिती उपलब्ध होणार.