शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गेल्या चार वर्षांत २० हजार उद्योगांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:25 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘फौंड्री हब’ अशी आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रात ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत २० हजार ८१९ उद्योगांची नोंदणी झाली आहे. त्यातून साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक आणि सुमारे एक लाख ३५ हजार ४५ जणांना रोजगार उपलब्ध झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्रातील आकडेवारीवरून दिसते.सप्टेंबर २०१५ पर्यंत उद्योगांची ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘फौंड्री हब’ अशी आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रात ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत २० हजार ८१९ उद्योगांची नोंदणी झाली आहे. त्यातून साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक आणि सुमारे एक लाख ३५ हजार ४५ जणांना रोजगार उपलब्ध झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्रातील आकडेवारीवरून दिसते.सप्टेंबर २०१५ पर्यंत उद्योगांची नोंदणी अथवा ते सुरू करताना पहिल्यांदा जिल्हा उद्योग केंद्राकडेअर्ज करावा लागत होता. त्यानंतर उद्योग निरीक्षकांनी पाहणीकेल्यानंतर संबंधितांना नोंदणीसह तो सुरू करण्याची परवानगी दिली जात होती. मात्र, आॅक्टोबर २०१५ पासून या प्रक्रियेत बदल केला आहे.केंद्र सरकारच्या ‘उद्योग आधार’ या पोर्टलवर आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर नोंदणी मिळत आहे. नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली. ‘उद्योग आधार’ सुरू होण्यापूर्वी सन २०१४-१५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात २ हजार ८२७ उद्योगांनी ८७२ कोटींची गुंतवणूक करून १८ हजार ६९७ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. ‘उद्योग आधार’च्या पहिल्या वर्षात उद्योगांची नोंदणी ३६५२ इतकी झाली. त्यानंतरच्या दुसºया वर्षी ८२९० आणि गेल्यावर्षी ६०५० इतक्या उद्योगांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक उद्योग हे सूक्ष्म गटातील आहेत. त्यापाठोपाठ लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये आहे. नोंदणीकृत उद्योग, त्यांच्याकडून झालेली गुंतवणूक आणि उपलब्ध रोजगारांची संख्या पाहता उद्योगक्षेत्र वाढीचे चित्र आहे.पडताळणीची प्रक्रिया बंद‘उद्योग आधार’ सुरू झाल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया वेगवान झाली आहे. मात्र, नोंदणीकृत झालेले उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत का? त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे नेमके किती उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत; त्यांनी किती गुंतवणूक केली असून किती रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्याची ठोस माहिती उपलब्ध होत नाही.आकडा यामुळे दिसतो मोठाबहुतांश उद्योजक हे स्वमालकीच्या जागेमध्ये उद्योग सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीतील ५० टक्के हिस्सा हा जागा खरेदीवर खर्च होत आहे. तसेच आणखी दहा टक्के हिस्सा हा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी खर्च होतो. त्यामुळे आकडा मोठा दिसत आहे.आकडेवारी दृष्टिक्षेपातवर्षे उद्योगांची रोजगार उपलब्धता गुंतवणूकनोंदणी (हजारांत) (कोटींमध्ये)२०१४-१५ २८२७ १८६९७ ८७२२०१५-१६ ३६५२ ३२३०० ११४४२०१६-१७ ८२९० ४५००० ३८१५२०१७-१८ ६०५० ३९०४८ १६००