शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १००० बालगृहांची नोंदणी दोन वर्षांपासून रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:13 IST

राज्यातील १०४२ बालगृहांची नोंदणी दोन वर्षांपासून रखडली आहे. कायद्याने शक्य नसूनही राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आहे.

विश्वास पाटील कोल्हापूर : राज्यातील १०४२ बालगृहांची नोंदणी दोन वर्षांपासून रखडली आहे. कायद्याने शक्य नसूनही राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे पाच वर्षांत नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. पण मूळ नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यास दोन वर्षे लागत आहेत.बाल न्याय कायद्यानुसार बालकांसाठी विनापरवाना निवासी संस्था चालविणे शिक्षापात्र गुन्हा आहे. तरीही सरकारकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यास चालढकल होत आहे. महिला व बालविकास विभाग ही प्रमाणपत्रे देते. त्यासाठी मार्च २०१८ मध्ये अर्ज मागवण्यात आले होते. दोन टप्प्यांत ११७३ संस्थांचे अर्ज आले. सरकारने नियमित कामकाज व नीट कागदपत्रे असलेल्या १३१ संस्थांना मार्च२०१९ मध्ये प्रमाणपत्रे दिली. ज्यांना ही प्रमाणपत्रे दिली नाहीत,त्यापैकी मुले असलेल्या संस्थांना १ मार्च २०१९ रोजी पुढील आदेर्शापर्यंत मुदतवाढ मिळाली. परंतु एक वर्ष उलटूनही नोंदणी प्रमाणपत्र दिलेली नाहीत. बालकांसाठी विनापरवाना निवासी संस्था चालविल्यास एक वर्षापर्यंत कैद आणि एक लाखापेक्षा कमी नाही इतका दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.अनुदान किती ?या संस्थांतील एका मुलामागे सरकार दरमहा १२३५ रुपये अनुदान देत होते. ते दोन हजार रुपये झाले आहे. या संस्थांमध्ये मुलांची क्षमता १० पासून १०० आहे.कारण असेही...या संस्था बीड, लातूर,नांदेड जिल्ह्यांत जास्त आहेत. बालकांचे कल्याण करण्याची खरेच किती संस्थांची इच्छ आहे, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे अशा संस्थांची छाननी करून नोंदणी प्रमाणपत्र देताना सरकारपुढे अडचणी येत आहेत.>काय आहे अडचण ?अनेक संस्थांना इमारती नाहीत । आवश्यकता नसताना संस्थांची मागणी । मुलांसाठी प्राथमिक साधन-सुविधांची वानवाआलेल्या प्रस्तावांची छाननी करून ते सरकारकडे सादर केले आहेत. तिथे तपासणी सुरू आहे. तोपर्यंत कार्यरत संस्थांना मुदतवाढ दिली आहे.- रवि पाटील, उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, पुणे