शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकर भरतीने नव्या संचालकांचा श्रीगणेशा

By admin | Updated: May 22, 2015 00:13 IST

जिल्हा बँक : पहिल्याच बैठकीत होणार ठराव; भरतीचा फेरप्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील नोकर भरतीबाबत फेरप्रस्ताव तयार करण्याचा ठराव पहिल्याच बैठकीत होणार आहे. नोकर भरतीच्या प्रस्तावापासूनच नव्या संचालक मंडळाच्या कारभाराचा श्रीगणेशा होणार आहे. एकूण दोनशे कर्मचाऱ्यांच्या भरतीचा फेरप्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील प्रशासकराज बुधवारी संपुष्टात आले असून, संचालक मंडळाचा कारभार आता सुरू झाला आहे. रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकांच्या कालावधित बराच पाठपुरावा झाला होता. प्रशासकांच्याच कालावधित नोकरभरती होईल, अशी शक्यताही वर्तविली जात होती. तसे प्रयत्नही झाले होते. दीड वर्षापूर्वी याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली नाही. आता प्रशासकराज संपुष्टात आल्याने नव्या संचालक मंडळामार्फत यासाठी विशेष प्रयत्न होण्याची चिन्हे दिसत आहेत. संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची उलाढाल गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तुलनेने कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्याच्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. नव्याने काही योजना राबवायच्या असतील, तर अपुऱ्या संख्याबळाचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. नव्या संचालक मंडळामार्फत याबाबतचा पाठपुरावा आता केला जाणार आहे. अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी निवडीनंतर नोकर भरतीविषयी प्रतिक्रिया दिली होती. बॅँकेतील नोकरभरती अत्यंत पारदर्शीपणाने पार पाडली जाईल, असे आश्वासन देतानाच त्यांनी नोकर भरतीला प्राधान्य देण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या संकेतानुसार आता बॅँकेत कर्मचारी भरतीबाबतच्या फेरप्रस्तावाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)असे आहे बळ...जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात २१७ शाखा आहेत. एकूण मंजूर असलेल्या पदांची संख्या १४०४ आहे. सध्याची कर्मचारी संख्या १०२८ इतकी आहे. अजून सुमारे पावणेचारशे कर्मचाऱ्यांची गरज बॅँकेला आहे. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात प्रशासक कालावधित २०० कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आता प्रशासकराज संपुष्टात आल्याने नोकरभरतीसाठी फेरप्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे त्यादृष्टीने आता तयारी सुरू झाली आहे.