ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्यावेळी दिसत नसल्याने अपघात होतात. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर लावल्यास रात्री-अपरात्री होणारे अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. वाहनधारकांनी वाहन चालविताना रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा कानमंत्र सहायक प्रादेक्षिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आणि जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी यांनी दिला.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक नीलेश ठोंबरे, वरिष्ठ मॅनेजर (केन) संग्राम पाटील, प्रवीण गोजारे फौंडेशनचे प्रकल्प अधिकारी नितीन कुरळुपे, डाॅ. अजित पाटील, दिलीप पाटील, पी. के. पाटील, अनिल कांबळे, तानाजी पोवार, भुजंग पाटील, आर. के. संकपाळ, सुरेश चेचर, आदींसह ट्रॅक्टर, ट्रक वाहन चालक, बैलगाडीवान उपस्थित होते.