कोल्हापूर : चित्रपटसृष्टीत काम करत असलेले कोल्हापूर परिसरातील तंत्रज्ञ, कामगारांची ओळख करून देणारी संदर्भपुस्तिका आणि कलाकारांच्या कार्याची ओळख करून देणारा लेखसंग्रह प्रकाशित करणे तसेच चित्रपट निर्मात्याला प्रोत्साहन म्हणून ‘कला पुरस्कार’ देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सिनेपत्रकार संघाच्या बैठकीत झाला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस अध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, उपाध्यक्ष बाबासाहेब अत्तार, सुभाष भुरके, सुनीलकुमार सरनाईक, अरुण शिंदे उपस्थित होते.यावेळी सर्वांच्या सहमतीने वरील ठराव करण्यात आले. कोल्हापुरात चित्रपटक्षेत्रात अनेक तंत्रज्ञ उपेक्षित आहेत. नृत्यदिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक, ड्रेस डिझायनर, छायाचित्रणकार याशिवाय अनेक तंत्रज्ञांचा यात समावेश होतो. या सर्वांची ओळख करून देणारी ही संदर्भपुस्तिका असेल. बैठकीच्या सुरुवातीला पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ आणि ज्येष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)
चित्रपट तंत्रज्ञांची निघणार संदर्भपुस्तिका
By admin | Updated: October 23, 2014 00:08 IST