शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांवरील कराचा बोजा घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 00:58 IST

गुडस् अँँड सर्व्हिस टॅक्स चर्चासत्र : एस. जयकुमार यांचे प्रतिपादन; उद्योजक, व्यावसायिकांशी साधला संवाद

कोल्हापूर : ‘जीएसटी’मुळे करांवरील कर लागू होणे थांबणार असून, ग्राहकांवरील छुप्या कराचा बोजा घटण्याची शक्यता आहे. शिवाय कररचनेत सुसूत्रता येण्यासह करचुकवेगिरीला आळा बसण्यास मदत होईल, असे प्रतिपादन चेन्नईतील करतज्ज्ञ अ‍ॅड. एस. जयकुमार यांनी गुरुवारी येथे केले. येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात गुड्स अ‍ॅँड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी)बाबतच्या चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभागाचे आयुक्त वसा शेषागिरी राव, तर उपायुक्त श्रद्धा जोशी, सहआयुक्त शामधर प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभाग आणि विविध औद्योगिक संघटनांतर्फे हे चर्चासत्र आयोजित केले होते.अ‍ॅड. एस. जयकुमार म्हणाले, सध्या करांवरील कराचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. जीएसटीमुळे वस्तूच्या मूळ किमतीवर कर लावण्यात येणार असल्याने ग्राहकांवरील कराचा बोजा घटणार आहे. कॅनडा, आॅस्ट्रेलिया अशा प्रगत देशांतील करप्रणालीचा अभ्यास करून आपल्या देशाने ‘जीएसटी’चे प्रारूप बनविले आहे. यात केंद्र, राज्य आणि आंतरराज्य असे जीएसटीचे प्रारूप आहे. जीएसटी लागू झाल्यास कररचनेत सुसूत्रता येण्यासह करचुकवेगिरीला आळा बसण्यास मदत होईल. शिवाय सर्वांनाच समान कर रचना लागू असणार आहे.वसा शेषागिरी राव म्हणाले, जीएसटीमुळे उद्योजक, व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभागाकडून मार्गदर्शन घ्यावे. शिवाय काही सूचना असल्यास द्याव्यात. त्या केंद्राकडे पाठविल्या जातील. कार्यक्रमास नितीन वाडीकर, कमलाकांत कुलकर्णी, संजय जोशी, समीर परीख, योगेश कुलकर्णी, प्रदीपभाई कापडिया, चार्टर्ड अकौंटंट गिरीश कुलकर्णी, आदींसह उद्योजक, व्यावसायिक उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी स्वागत केले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र दिवाण यांनी आभार मानले. दरम्यान, सुमारे दीड तास रंगलेल्या या चर्चासत्रात अ‍ॅड. जयकुमार यांनी उद्योजक, व्यावसायिकांशी ‘जीएसटी’तील विविध पैलूंबाबत संवाद साधला. (प्रतिनिधी)‘एलबीटी’ राहणारचजीएसटीमध्ये एलबीटी, व्यावसायिक कर यांचा समावेश केलेला नाही. ५० कोटींवरील उलाढालीवर एलबीटी लागणार आहे. त्यामुळे जीएसटी लागू झाला तरी, एलबीटी राहणारच असल्याचे अ‍ॅड. एस. जयकुमार यांनी सांगितले.