शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यात कपात

By admin | Updated: May 10, 2017 00:50 IST

ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय : आणखी दोन तास वीज कपात वाढ, शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क --कोपार्डे : शासन कोणाचेही असू दे कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर त्याची सुरुवात शेतकऱ्यांपासूनच करावयाची हा जणू अजेंडाच ठरला आहे. ५ मेपासून शेतीपंपासाठी १२ तास सुरू असलेला वीजपुरवठा दोन तास कमी करण्याबरोबर त्याच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार ‘महावितरण’ने केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहेत.पावसाळा संपताच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सलग बारा तास वीज देण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. जानेवारी महिन्यात १२ तासांची वीज आठ तासांवर आणून शासनाने शेतकऱ्यांना धक्का दिला. यावर माध्यमांनी शेतकऱ्यांच्या संतापाला वाचा फोडल्यानंतर महावितरणने हा वीजपुरवठा दहा तास केला. मात्र, काही दिवसांतच रात्रीच्या वीजपुरवठ्यात बदल न करता दिवसा होणाऱ्या वीजपुरवठ्यात पुन्हा दोन तास कपात करून दिवसा आठ तास वीज देण्याचा निर्णया झाला, तर रात्री दहा तास वीजपुरवठा शेतीपंपांना देण्यास सुरुवात केली.यामध्ये पुन्हा बदल करून महावितरणने ५ मेपासून रात्री शेतीपंपांना दिला जाणारा वीजपुरवठा आठ तास केला असून रात्री ९ ते सकाळी ७ ऐवजी मध्यरात्री १२.४५ ते सकाळी ८.४५ असा वीजपुरवठा वेळेत बदल केला असून मध्यरात्री शेतकऱ्यांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. एवढेच नाही तर ही आठ तास केला जाणारा वीजपुरवठा सलगपणे नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.सध्या ऊसपिकाबरोबर सूर्यफुल, भात, मका या रब्बी पिकांना उन्हाच्या तडाख्याने पाण्याची गरज असते. अशावेळी सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नदी, विहिरीमध्ये पाणी असून देखील विजेअभावी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे. वीज आल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाटात पाणीजिल्ह्यातील बहुतांश भागात नदीपासून दूरवर असणाऱ्या क्षेत्रासाठी काही शेतकऱ्यांनी बँकांची कर्जे काढून नऊ ते दहा हजार फूट पाईपलाईन टाकल्या आहेत. लाईट आली की, किमान अर्ध्या तासानंतर पाटात पाणी पडते. यामुळे मध्येच अचानक वीज गेल्यास हीच अवस्था होत असल्याने सलग वीज मिळत नसल्याने व जेवढी वेळ वीज गेली तेवढी वाढ मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.पाण्याची आवश्यकता असताना महावितरणने अचानक वीजपुरवठ्यात कपात करण्याबरोबर वेळेत बदल केल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर सलग वीजपुरवठा होत नसल्याने पाण्याच्या फेरांमध्ये अंतर वाढत असून, संस्थाचालक व शेतकऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार होत आहेत. दिवसा दहा तास सलग वीज दिली तरच ऊसपीक वाचणार आहे.- सुभाष पाटील, अध्यक्ष केदारलिंगपाणीपुरवठा संस्था, वाकरे, ता. करवीर.