कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी मृत्यू कमी येत नसल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागही चिंतेत आहे. ही वाढती मृत्युसंख्या कशी रोखायची हाच एक प्रश्न सध्या प्रशासनाला सतावत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १०५० रुग्ण नोंंदवण्यात आले असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोल्हापूर शहरात २४४, करवीर तालुक्यात २११ तर, हातकणंगले तालुक्यात १२१ नवे रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरात आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्याखालोखाल करवीर आणि हातकणंगले तालुक्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
तालुकावार मृतांची आकडेवारी
कोल्हापूर ०८
जिरगे गल्ली, संभाजीनगर, रुईकर कॉलनी, शुक्रवार पेठ, लक्षतीर्थ वसाहत, नागराजनगर, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर शहर
करवीर ०७
गिरगाव, गांधीनगर, कोथळी, उचगाव, पाचगाव, कोगील बु., शिंगणापूर
हातकणंगले ०७
पेठ वडगाव २, हुपरी २, चोकाक, हेर्ले, रांगोळी
कागल ०३
कागल, सावर्डे बुद्रुक, एकोंडी
भुदरगड ०२
कडगाव, कूर
इचलकरंजी ०२
चंदगड ०१
ढेकोळी
गडहिंग्लज ०१
ऐनापूर
राधानगरी ०१
चांदेकरवाडी
इतर जिल्हे ०५
वाळवे, कोगनोळी, उन्हाळे, तारवाडी, दापोली