शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील आयलँडचा घेर कमी करा

By admin | Updated: May 8, 2014 12:25 IST

सुशोभीकरण करतानाच वाहतुकीचा विचार करण्याची मागणी

 कोल्हापूर : पन्नास वर्षांपूर्वी शहरातील वाहतुकीचा विचार करून शहरातील मुख्य चौकांत पुतळे व आयलँडची उभारणी केली. आता वाढत्या नागरिकरणामुळे शहरात वाहतुकीचा ताण वाढला आहे. पुतळ्याभोवतीचे कठडे व आयलँडभोवतीची संरक्षक भिंत कमी करून वाहतुकीचा ताण कमी करावा, अशी मागणी अनेक वाहनधारकांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनवर केली. शहरातील अयोध्या चित्रमंदिराच्या दारात असलेल्या आईसाहेब महाराज पुतळ्याभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. आईसाहेब महाराज यांच्या पुतळ्याभोवती असणारे संरक्षण कुंपण खराब होऊन पुतळ्यासमोरील मोठा कारंजाही गेली कित्येक वर्षे बंद स्थितीत होता. नवीन आराखड्यानुसार पुतळ्याच्या मागून असलेला प्रवेशात बदल करून पूर्वेकडून प्रवेशद्वार केले जाणार आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस बगीचा केला जाईल. पुतळ्याच्या समोरील जुना कारंजा काढून तिथे रेखीव दगडी चबुतरा उभारला जाणार आहे. संगमरवरी पुतळा प्रदूषणामुळे काळवंडला आहे. तज्ज्ञांकडून पुतळ्याची स्वच्छता करून पूर्ववैभव प्राप्त केले जाणार आहे. शिवाजी टेक्निकल व ट्रेझरीच्या बाजूला दीर्घकाळ टिकणारे छोटे कारंजे उभारण्यात येणार आहे. लक्ष्मीपुरीकडे जाणार्‍या वाहतुकीचा ताण विचारात घेऊनच संरक्षक भिंतीची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे. शिवाजी पूल येथील आयलँडही मोठा आहे. वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडतो. नवीन शिवाजी पुलाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर चौकातील आयलँडची निर्मिती करताना शहरात कोकणातून येणार्‍या वाहनांचा विचार केला जावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)