शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रूपांतरित कर कमी करून दिलासा देऊ

By admin | Updated: May 30, 2016 00:42 IST

खडसे : महाडिक, देसाई यांच्या मागणीवर घोषणा

कोल्हापूर : रूपांतरित करासंदर्भातील दंडाच्या नोटिसा रद्द केल्या नाहीत किंवा दंडाची रक्कम माफक केली नाही तर जनभावना भाजप व सरकारच्या विरोधात जाईल, ही बाब आमदार अमल महाडिक व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वतंत्ररीत्या निवेदनाद्वारे रविवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर रूपांतरित कर कमीत कमी करून मिळकतधारकांना दिलासा देऊ, अशी घोषणा खडसे यांनी केली.रविवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कोल्हापूर विमानतळावर आमदार अमल महाडिक व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी रूपांतरित करासंदर्भात स्वतंत्रपणे निवेदन दिले.शहरातील १७००० मिळकतधारकांना ‘ब’सत्ताप्रकारांतर्गत रूपांतरित करासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसीद्वारे बजावण्यात आलेला दंड अव्वाच्या सव्वा आहे. त्यामुळे या नोटिसी रद्द कराव्यात किंवा दंडाची रक्कम कमी करावी. असे न झाल्यास आपल्याविरोधात जनभावना निर्माण होईल, असे आमदार महाडिक यांनी सांगितले.कोल्हापूर शहरात रूपांतरित कर लावणे ही शहरवासीय व जिल्ह्यातील ४० हजार कुटुंबीयांवर प्रभाव पाडण्यासारखे आहे. तरी याबाबत योग्य तो निर्णय त्वरित घेऊन महसूल खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्याची सूचना करावी, असे संदीप देसाई यांनी निवेदनाद्वारे म्हटले.यावर तमनाकवाडा (ता. कागल) येथे भाजपतर्फे आयोजित सर्वपक्षीय पाणी परिषदेमध्ये महसूलमंत्री खडसे यांनी रूपांतरित करासंदर्भात घोषणा करून कराची रक्कम कमीत-कमी घेऊन मिळकतधारकांना दिलासा देण्यात येईल असे सांगितले. तसेच हा कर रद्द करणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)