शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

रेडीरेकनर दरवाढीमुळे घराचे स्वप्न महाग

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

बांधकाम व्यवसाय धोक्यात : शहरात सर्वाधिक दर गुजरीत; घर खरेदीचे सामान्यांचे स्वप्नच!

कोल्हापूर : राज्य सरकारकडून राज्यभरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी सात ते आठ टक्के वाढ केली असली तरी शहरी भागात मात्र हाच रेडीरेकनरचा दर दहा टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या वाढीमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या बांधकाम व्यवसायावर अगोदरच मंदीचे सावट असताना त्यातच रेडीरेकनरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे अगर खरेदी करण्याचे स्वप्न आता आवाक्याबाहेर गेले आहे. कोल्हापूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आहे. अनेक ठिकाणी बंगलोज व फ्लॅट बांधून तयार असताना त्याला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यातच रेडीरेकनरचे दर वाढल्याने व बांधकाम व्यावसायिकांची गुंतवणूकही झाल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याने साहजिकच फ्लॅट, बंगल्यांच्या किमतीत वाढ होणार आहे. अगोदरच ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मेटाकुटीला आलेला बांधकाम व्यावसायिक या वाढलेल्या रेडीरेकनरच्या दरामुळे आणखी मोडकळीस येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने डिसेंबर २०१५ मध्येच कोल्हापूर शहराचा रेडीरेकनरचा दर दहा टक्क्यांनी वाढविला होता, त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. शासनाने या दरामध्ये दहा टक्के वाढ करून घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कोल्हापूर शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून महाद्वार रोडला प्राधान्य दिले जाते, पण यापेक्षा गुजरी व पाठोपाठ भाऊसिंगजी रोडवर रेडीरेकनरचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून आले, तर लाईनबझार येथे सर्वांत कमी दर आहे. एकाच शहरात वेगवेगळ्या भागांत रेडीरेकनरचे दर वेगवेगळे आहेत. शहराची हद्दवाढ न झाल्याने आहे त्याच जागेवर ताण येऊन रेडीरेकनरचे दर झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. भाऊसिंगजी रोडवरील रेडीरेकनर हा चौरस मीटरचा दर ५० हजारांहून अधिक गेला आहे. कोल्हापूर शहरानजीकच्या पूर्वेस महामार्ग असल्याने उचगावमधील दर हा सुमारे ३५०० रुपयांपर्यंत गेला आहे, तर मुडशिंगी येथील रेडीरेकरनचा दर हा २९२० रुपयांपर्यंत गेला आहे. याशिवाय सरनोबतवाडी, पाचगाव, कळंबा, बालिंगा व वडणगे या ठिकाणचा दर हा २३८० पासून १६६० रुपयांपर्यंत आहे. परिसर खुल्या जागेचे दर घरांचे दर गुजरी ४८७६० ५५२८० शिवाजी रोड ४७७७० ५०८७० भाऊसिंगजी रोड ४९१७० ५१८१० महाद्वार रोड ३७९०० ४२८५० ताराबाई रोड ४१३८० ४४४१० बिंदू चौक ३७८२० ४२२३० उमा टॉकीज ४०५५० ४१३६० महाराणा प्रताप चौक ३८३५० ४०१०० व्हीनस कॉर्नर १९०६० ४०८९० ताराराणी चौक २९३०० ४१८८० सीबीएस ४२००० ४५२३० राजारामपुरी ३४३१० ४१८१० ट्रेड सेंटर २१११० ४१८१० सिंचन भवन २६३८० ४४७३० जिल्हाधिकारी कार्यालय २९३१० ४६५२० शिवाजी पार्क २०९०० ४२६२० दाभोळकर कॉर्नर ३७७०० ४४६५० महावीर कॉलेज १८६३० ४४४३० मार्केट यार्ड ८५०० ३६८९० लाईन बझार ६४६० ३५५४० असेंब्ली रोड २३४०० ४२६२० रुईकर कॉलनी १७५०० ३९०८० आरटीओ परिसर २६३९० ४४३००