शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

साखरेच्या ६२ कोटींची वसुली शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 20:31 IST

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र ९८२० सभासदांना गेले ६१ महिने वाटप केलेल्या साखरेचा प्रश्न पुढे आला असून, त्या साखरेच्या रकमेची वसुली होण्याची दाट शक्यता आहे. अपात्र सभासदांना वर्षाला सहा लाख ३८ हजार ३०० किलो साखरेचे सवलतीच्या दराने वाटप झाले आहे. तत्कालीन बाजारभाव व सवलतीच्या ...

ठळक मुद्दे ‘बिद्री’ अपात्र सभासद प्रकरण : भाग भांडवलाचे १० कोटी सभासदांना द्यावे लागणार चार वर्षांनंतर हा निर्णय झाल्याने हा संघर्ष थांबेल असे वाटत असतानाच कारखान्याचे प्रशासन अडचणीत येणार आहेसभासद अपात्र ठरल्याने त्यांना वाटप केलेल्या साखरेचा विषय चर्चेत

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र ९८२० सभासदांना गेले ६१ महिने वाटप केलेल्या साखरेचा प्रश्न पुढे आला असून, त्या साखरेच्या रकमेची वसुली होण्याची दाट शक्यता आहे. अपात्र सभासदांना वर्षाला सहा लाख ३८ हजार ३०० किलो साखरेचे सवलतीच्या दराने वाटप झाले आहे. तत्कालीन बाजारभाव व सवलतीच्या दरांतील तफावतीची रक्कम सुमारे ६२ कोटी होत आहे; तर या सभासदांचे दहा कोटी शेअर भांडवल परत करावे लागणार असल्याने कारखान्याच्या प्रशासनासमोर पेच निर्माण होणार आहे.

सर्वाधिक सभासद असणारा ‘बिद्री’ साखर कारखाना हा देशातील एकमेव आहे. कारखान्याचे वाढीव सभासदांसह ७० हजार सभासद होते. कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असल्याने सभासद संख्या जास्त असणे स्वाभाविक असले तरी इतर कारखान्यांच्या तुलनेत तिप्पट सभासद संख्या झाली. वाढीव सभासदांविरोधात झालेल्या तक्रारी आणि त्यानंतर चौकशीतून ९८२० सभासद अपात्र ठरले; पण जून २०१२ पासून या वाढीव सभासदांना कारखान्यांकडून सवलतीच्या दरात महिन्याला पाच व दिवाळीसाठी पाच किलो अशी वर्षाला ६५ किलो साखर दहा रुपये किलो दराने दिली जाते.

हे सभासद अपात्र ठरल्याने त्यांना वाटप केलेल्या साखरेचा विषय चर्चेत आला आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने अपात्र म्हणून शिक्कामोर्तब केल्यापासून पुढे साखर बंद करण्याचा निर्णय कारखाना प्रशासन घेणार आहे. पण मागे पाच वर्षे वाटप केलेल्या साखरेविषयी पेच निर्माण होणार आहे. जून २०१२ पासून ६१ महिने या सभासदांना साखरेचे वाटप केले आहे. गेल्या पाच वर्षांतील साखरेचा बाजारातील सरासरी दर ३० रुपये होता आणि सभासदांना दहा रुपयांप्रमाणे वाटप केले. त्यामुळे प्रतिकिलो २० रुपयांची तफावत गृहीत धरली तर साखरेच्या माध्यमातून ६२ कोटी ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसते.

कारखाना प्रशासनाने सभासदत्व देताना त्यांच्याकडून १० हजार रुपये भाग भांडवल घेतले आहे. गेले पाच वर्षे ही रक्कम कारखाना व्यवस्थापन वापरत आहे. या रकमेच्या बदल्यात प्रशासन सवलतीच्या दरात साखर देते; पण सहकार कायद्यात हे बसत नसल्याने जर साखर आयुक्तांनी अपात्र सभासदांची वाटप केलेली साखर परत घेण्याचा निर्णय घेतला, तर कारखान्याचे प्रशासन अडचणीत येणार आहे. सभासदांचे भाग भांडवल परत करण्याचा निर्णय घेतला तर पाच वर्षांच्या व्याजाचा मुद्दा पुढे येऊ शकतो. कायद्यानुसार भाग भांडवलाला व्याज देता येत नाही.

‘बिद्री’ सभासदांच्या ‘पात्र-अपात्रते’वरून गेली चार वर्षे मोठा संघर्ष झाला. स्थानिक पातळीबरोबरच न्यायालयीन लढाईसाठी दोन्ही गटांकडून निकराची ताकद लावली गेली. चार वर्षांनंतर हा निर्णय झाल्याने हा संघर्ष थांबेल असे वाटत असतानाच अपात्र सभासदांच्या साखरेचा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे.तत्कालीन संचालकच जबाबदारकारखाना पोटनियमनुसार कागदपत्रांची तपासणी न करता तत्कालीन संचालक मंडळाने संबंधितांना सभासद करून घेतले. त्याचबरोबर त्यांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा निर्णय घेतला. चुकीचा ठराव केल्याचा ठपका ठेवून संचालक मंडळाला जबाबदार धरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्रतिसभासद सात टन ऊस पुरवठाकारखान्याचे जुने सभासद ४७ हजार, त्यात मध्यंतरी ४३०० सभासद वाढविले. त्यानंतर १४ हजार ५६३ नव्याने सभासद केले. हंगाम २०१६-१७ मध्ये एकूण ६९ हजार सभासद आणि साडेचार लाखांचे गाळप झाले होते. म्हणजे सरासरी प्रतिसभासद सात टनच उसाचा पुरवठा झाल्याचे स्पष्ट होते.