शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा २५.६४ कोटींचा वसूल

By admin | Updated: March 30, 2016 00:07 IST

इचलकरंजी नगरपालिका : ९० टक्क्यांहून अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट

इचलकरंजी : शहरातील वस्त्रोद्योगात असलेली मंदी आणि ऐन वसुलीच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागलेले निवडणुकीचे काम असे असतानाही दररोज सरासरी तीस लाख रुपयांची घरफाळा वसुली होत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ९० टक्क्यांहून अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या २५ कोटी ६४ लाख ३५ हजार ७४५ रुपयांची घरफाळा वसुली झाली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार व कर वसुली अधिकारी महिपती बाबर यांनी दिली.शहराचा प्रमुख उद्योग असलेल्या वस्त्रोद्योगामध्ये सातत्याने आर्थिक मंदी आहे. त्याचबरोबर वसुलीचे काम वेगाने सुरू झाले असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानकपणे निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सर्वेक्षणाचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला. त्यातच फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा व मार्चचा पहिला आठवडा या कालावधीत शहरास पाणीटंचाईने सतावले. त्याचाही मोठा परिणाम कर वसुलीवर झाला.अशा परिस्थितीमध्येसुद्धा घरफाळा व पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी शहरातील प्रत्येक वॉर्डासाठी एक याप्रमाणे २५ वसुली पथके स्थापन करून त्यांना गतिमान करण्यात आले. कर वसुलीसाठी प्रसंगी नळ जोडण्या तोडणे, जप्तीची मोहीम हाती घेणे आणि मालमत्ता सील करणे अशा प्रकारच्या कारवाया करणे भाग पडले, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)धडक मोहिमेला नागरिकांचा प्रतिसादसन २०१५-१६ ची घरफाळा वसुली २९ कोटी ९९ लाख ४५ हजार ८० रुपये होती. त्यापैकी आतापर्यंत २३ कोटी ११ लाख ८४ हजार १८४ रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच मागील वर्षापर्यंतची थकबाकी दहा कोटी ६६ लाख ११ हजार ३८५ होती. त्यातील दोन कोटी ५२ लाख ५१ हजार १६१ रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत २५ कोटी ६४ लाख ३५ हजार ७४५ रुपये वसूल केले आहेत. ही धडक मोहीम अशीच चालू ठेवण्यात येणार असून, ९० टक्क्यांपेक्षा जास्त वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असाही ठाम विश्वास अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी व्यक्त केला.