शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक निरीक्षण पथकाच्या सरबराईसाठी लाखोंची वसुली

By admin | Updated: February 5, 2015 23:16 IST

वार्षिक निरीक्षणासाठी आलेल्या पथकाच्या सरबराईच्या नावाखाली लाखोंची वसुली करण्यात आली. विशेष महानिरीक्षकांच्या निरीक्षणादरम्यान यवतमाळ पोलीस उपविभागातील

राजाराम पाटील- इचलकरंजी -यंत्रमाग कापडाला मागणी नसल्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कापडाची विक्री होत आहे. अशा मंदीच्या काळातच वीज दरवाढ, कामगारांची वाढणारी मजुरी व व्यापाऱ्यांकडून खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीत वाढ न होणे अशा तिहेरी कचाट्यात येथील वस्त्रोद्योग सापडला आहे. परिणामी यंत्रमागधारकांबरोबर कापड उत्पादकही धास्तावले आहेत.शहर व परिसरात सुमारे सव्वा लाख यंत्रमाग आहेत. त्यापैकी ५० टक्के यंत्रमागांवर केम्ब्रिक पद्धतीने कापड उत्पादन होते. कॉटन व पॉलिस्टर अशा दोन्ही प्रकारच्या धोतीचे १० ते १५ टक्के आणि उर्वरित यंत्रमागांवर मोठा पन्ना, पॉलिस्टर पद्धतीच्या पीव्ही-पीसी सुताच्या कापडाची निर्मिती होते, तर साधारणत: पाच टक्क्यांपेक्षा कमी यंत्रमागांवर नक्षीकाम-बुट्टा प्रकारचे कापड उत्पादित होते; पण या कापडाला सातत्याने चांगली मागणी असते. मात्र, उपरोक्त उल्लेखनीय अन्य प्रकारच्या यंत्रमाग कापडाला मागणी मंदावल्याने हा यंत्रमाग उद्योग आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकला आहे.लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ सप्टेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर वस्त्रोद्योगामध्ये परिस्थिती सुधारेल, अशी आशा यंत्रमागधारकांना होती. त्यानंतर उलट सुताचे दर वाढत गेले; पण त्याप्रमाणात कापडाचे दर वाढले नाहीत. याचा परिणाम म्हणून उत्पादित खर्चापेक्षा कापडास दर कमी मिळू लागला आणि कापड उत्पादक यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांना नुकसान होऊ लागले. हीच परिस्थिती पुढे कायम राहिली आहे.सरकारने वाढीव वीज दरापोटी दिलेले अनुदान बंद झाल्यामुळे आणि महावितरण कंपनीने आणखीन वीज दरामध्ये वाढ करण्याची मागणी केल्यामुळे साधारणत: ३५ टक्के वीज दरवाढ अपेक्षित आहे. त्याचबरोबर लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार राज्य शासनाने २९ जानेवारीपासून यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी नवीन किमान वेतनाची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार कामगारांच्या मजुरीमध्ये सुमारे ३० ते ४० टक्के वाढ होण्याचा दावा कामगार संघटनेचा आहे, तर शहर व परिसरात असणाऱ्या एकूण यंत्रमागांपैकी ४० टक्के खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ देण्यास कापड व्यापाऱ्यांनी नकार दर्शविला आहे. वस्त्रोद्योगात असणाऱ्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर वरीलप्रमाणे वीज दरवाढ, कामगारांची मजुरीवाढ व खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीत वाढ करण्यास व्यापाऱ्यांनी दिलेला नकार, असे तिहेरी संकट यंत्रमाग उद्योगामध्ये येऊ लागले आहे.आॅटोलूमच्या जॉब रेटमध्ये घटयेथील वस्त्रोद्योगामध्ये सुमारे २५ हजार सेमी आॅटो व आॅटो लूम्स आहेत. वस्त्रोद्योगामधील मंदीचा परिणाम या क्षेत्रावरसुद्धा झाला आहे. शटललेस लूमच्या मजुरीमध्ये लक्षणीय घट झाली असून, ही मजुरी १२ ते १३ पैसे प्रतिमीटर इतकी झाली आहे. याचबरोबर रूटी-सी, रूटी-बी या लूमच्या मजुरीमध्येसुद्धा घट झाली असून, ती १४ ते १६ पैसे इतकी उतरली आहे.