शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली बँकांची वसुली

By admin | Updated: June 9, 2016 00:14 IST

यंदाचा खरीप हंगाम या आठवड्यात सुरू होत आहे. आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवीत आहे.

नितीन भगवान -- पन्हाळा नगरपरिषदेत पूर्वीपासून गटातटाचे राजकारण सुरू आहे. या गटांना एकत्र करून जनसुराज्य शक्ती पक्षाने गेली दहा वर्षे राजकारण केले; पण गट-तट त्यांना संपविता आले नाहीत. उलट प्रत्येक गटाला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव गोंजारत बसल्याने गट प्रबळ झाले. या गटाच्या राजकारणात गावाकडे दुर्लक्ष झाले आणि गट सत्तेसाठी भांडू लागल्याने विकासकामे रखडली आहेत.पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेची सत्ता गेली दहा वर्षे जनसुराज्य शक्ती पक्षाकडे आहे. २००८-२०१२ सालातील सत्ता संपूर्ण गावाने एकत्र येऊन बिनविरोध करून एकहाती दिली. २०१२ ते २०१६ साली निवडणूक होऊन त्यातही जनसुराज्य शक्ती पक्षाने बाजी मारली; पण या दहा वर्षांच्या कालावधीत या पक्षाने पन्हाळ्याचा विकास कोणताच केला नाही. उलट सत्ता संघर्षात दहा वर्षे वाया गेल्याने यावर्षी होणारी निवडणूक जनसुराज्य शक्ती पक्षाला वजा करूनच होण्याचे संकेत आहेत.२००८ साली विनय कोरे यांनी आपण मंत्रिपदावर आहे, पन्हाळा शहराचा कायापालट करू असे आश्वासन दिल्याने संपूर्ण गाव एकत्र येऊन बिनविरोध निवडणूक करून त्यांच्या हाती सत्ता दिली. बिनविरोध निवडीमुळे महाराष्ट्र शासनाकडून विशेष बक्षीस स्वरूपात रक्कम देण्याचे त्यांनी आश्वासित केले, पण ती रक्कम आजअखेर आलेली नाही. ते मंत्री असल्याने पन्हाळावासीय पन्हाळा सुशोभीकरणासाठी आणि पुरातन खात्याची घरे बांधकामाची अट शिथिल होण्यासाठी मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत होते; पण कोरे ते कोरेच, त्यांनी पन्हाळ््यासाठी कुठला शासकीय फंड दिला नाही, की पुरातन खात्याकडे प्रस्ताव दिला नाही.यामुळे २०१२ च्या निवडणुकीत कोरेंना बऱ्यापैकी विरोध झाला आणि निवडणूक लागली; पण विरोधी बाजू राष्ट्रवादीची भक्कमपणे काम करू शकली नाही. यामुळे पुन्हा कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडे सत्ता राहिली. नगराध्यक्ष पदाच्या सत्तेसाठी गट विभागले. यात मोकाशी गट प्रबळ ठरला. पहिल्या अडीच वर्षांत मागासवर्गीय अध्यक्ष पदातील सव्वा वर्ष विजय पाटील गटाला नगराध्यक्ष पद व सव्वा वर्ष मोकाशी गटाला नगराध्यक्ष पद मिळाले. त्यानंतरची अडीच वर्षे सर्वसाधारण नगराध्यक्ष पद राहिले. पुन्हा स्वत: असीफ मोकाशी विरुद्ध विजय पाटील असा सामना झाला. यात प्रत्येकी सव्वा वर्षा ठरले; पण या निवडीवेळी मोकाशी यांचा विनय कोरेंनी केलेला अपमान ते विसरले नाहीत. पर्यायाने त्यांनी आपल्या कार्यकालानंतर राजीनामा दिला नाही आणि विनय कोरेंना आमदारकीमध्ये साथ दिली नाही. पर्यायाने मोकाशी गटामुळे त्यांचे आमदार पद गेले,अशी तालुक्यात चर्चा होत आहे. मोकाशी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यावर आमदार सत्यजित पाटील यांनी आपली ताकद त्यांच्यामागे उभी केली.नगरपरिषदेस २००८-०९ साली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार मिळाला, २०१५-१६ साली स्वच्छ भारत अंतर्गत हागणदारीमुक्त पुरस्कार प्राप्त झाला आहे. पन्हाळा शहरात पर्यटकांची वार्षिक भेट अंदाजे दहा लाख इतकी आहे. नगरपरिषदेचे कविवर्य गोरोपंत ग्रंथालय असून, या ठिकाणी ५० हजार पुस्तके उपलब्ध आहेत. अत्यंत दुर्मीळ ग्रंथ आणि पुस्तकांबरोबरच गोरोपंतांची हस्तलिखिते आहेत.