- समीर देशपांडेकोल्हापूर - शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बीलांच्या फाईल्सपोटी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब लिहलेली नोंदवहीच येथील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात सापडली आहे. उध्दवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी या कार्यालयातच ही फाईल शोधून काढल्याने खळबळ उडाली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बीलांच्या फाईल्स लवकर निर्गत होत नसल्याच्या अनेक तक्रारी सुरू होत्या. अशातच याआधीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी चुकीचे आजार प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण गेल्या महिन्यात उघडकीस आले. याचाच आणखी शोध घेत असताना उध्दवसेनेचे पदाधिकारी सोमवारी सकाळी ११ नंतर सीपीआरमध्ये आले. त्यांनी प्रलंबित फाईल्स का राहिल्या असा सवाल करत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना फाईल्स दाखवण्याची विनंती केली. या फाईल्स पहात असतानाच लाल रंगाचे एक रजिस्टर मिळाले असून त्यामध्ये कोणत्या ‘मॅडम्ना’ आणि ‘सरांना’ किती रूपये दिले याच हिशोबच लिहून ठेवला आहे.
यामध्ये प्रत्येक पानाचा हिशोब केला असून त्या पानावर शेवटी कोणाला किती पैसे दिले याची नोंद आहे. याबाबत उध्दवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला असून त्यांनी आता यामध्ये सहभागी सर्वांना बडतर्फ करावे. यावेळी विजय देवणे, अभिजित साळोखे, मंजित माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे तीन अडीच तासाच्या गोंधळानंतर ही नोंदवही सील करण्यात आली. मंगळवारी संबधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी सांगितले.
Web Summary : A ledger detailing bribe payments for medical bill files was found in Kolhapur's Civil Surgeon office. Uddhav Sena demanded action after discovering the record, prompting a police investigation and promises of suspension of those involved.
Web Summary : कोल्हापुर के सिविल सर्जन कार्यालय में मेडिकल बिल फ़ाइलों के लिए रिश्वत भुगतान का विवरण मिला। उद्धव सेना ने रिकॉर्ड मिलने के बाद कार्रवाई की मांग की, जिससे पुलिस जांच और शामिल लोगों के निलंबन का वादा किया गया।