शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा विक्रम

By admin | Updated: October 24, 2015 01:18 IST

नवरात्रौत्सव : भाविकांनी गाठला २१ लाखांचा आकडा; असुविधांचाही त्रास

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भाविकांच्या संख्येने मंदिराच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच २१ लाखांचा टप्पा पार केला आहे. भक्तांच्या संख्येचा हा विक्रमी आकडा असला तरी त्यांना सामना करावा लागलेल्या गैरसोयींनीही असाच विक्रम गाठला आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांत अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. नवरात्रात ही आकडेवारी १५ लाखांच्या आसपास जाते. दोन वर्षांपूर्वी हा आकडा १६ लाखांपर्यंत गेला होता. यंदा मात्र त्यात तब्बल पाच लाख भाविकांची भर पडली असून नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजे १३ ते २२ आॅक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत देवस्थान समितीने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल २१ लाख ६ हजार ६५३ इतक्या भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. अंबाबाईची सर्वदूर पसरलेली ख्याती, कोल्हापूरसह कल्याण-डोंबिवली येथील महापालिकेच्या निवडणुका, पुण्यासह, सांगलीतून मोठ्या संख्येने आलेले भाविक या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून ही उच्चांकी गर्दी झाली. मात्र दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तितक्याच गैरसोयींचा सामना करावा लागला. पार्किंगची व्यवस्था, रस्त्यांचे नियोजन, स्वयंसेवी संस्थांंच्या तातडीच्या आरोग्य सुविधा आणि भाविकांना पाण्याची सोय या सुविधा वगळता बाकी सगळ्या नियोजनाचा बोजवारा उडाला होता. पूजांतून छुपा अजेंडा...नवरात्रौत्सवात शक्तिरूपी दुर्गेची विविध रूपे अंबाबाईच्या माध्यमातून साकारली जातात. यंदा मात्र श्रीपूजकांनी अंबाबाईची केवळ कमळातीलच बैठी पूजा बांधून जणू अंबाबाईच्या ‘लक्ष्मीकरणा’चा चंग बांधल्याचे जाणवले. आता ठरवून कमळातील बैठी पूजा बांधल्याने भक्तांमध्ये मात्र पुजाऱ्यांबद्दल अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याशिवाय केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. ‘आता महापालिकेवरही कमळ फुलवा,’ असा प्रचारच या पूजांतून केला गेल्याचा आरोप होत आहे. आडमार्गांनी दर्शन निवडणुकांमुळे कोल्हापुरातील राजकीय व्हीआयपी नसले तरी स्वयंघोषित व्हीआयपींमुळे भाविकांना अंबाबाईच्या दर्शनासाठी तब्बल पाच तासांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. शनिमंदिर, सटवाई मंदिर येथून भाविकांना सोडण्यात पोलीस आणि खासगी सुरक्षारक्षक आघाडीवर होते. त्यामुळे परराज्यांतून, शहरांतून आलेल्या भाविकांवर अन्याय झाला.