शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शाहू कारखान्यासाठी विक्रमी ८६.३९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 00:53 IST

मतदान शांततेत : आज दुपारपर्यंत निकाल जाहीर होणार; ऊस उत्पादक गटातून ११ संचालकांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात

कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी ८६.३९ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. १३,५०० मतदारांपैकी ११,६६२ मतदारांनी शांततेत मतदानाचा अधिकार बजावला. ऊस उत्पादक गटातून ११ संचालकांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंंगणात राहिल्याने हे मतदान झाले. कारखान्याचे बहुसंख्य सभासद मतदानाला आले होते. आज, बुधवारी कारखाना कार्यस्थळावर मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शैक्षणिक संकुलात सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. १६ ठिकाणी मतदान केंद्रे उभारल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावांतून सभासदांना आणणे-सोडण्यासाठी वाहनांची जय्यत व्यवस्था केली होती. यामुळे सकाळी दहा वाजता कागल-मुरगूड रोड, शैक्षणिक संकुलाचा परिसर वाहनांच्या गर्दीने भरून गेला होता. ११.३० वाजता तर कागल-मुरगूड रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली. तेथे उतरून सभासद चालत मतदान केंद्रावर आले.मतदान केंद्रावर सभासदांच्या रांगा लागल्या. दुपारी एकपर्यंत ही गर्दी कायम होती. हळूहळू गर्दी कमी होत गेली. दुपारी तीन वाजता बाहेरून आलेली वाहने निघून गेल्याने परिसर मोकळा झाला. सायंकाळी पाचपर्यंत तुरळक मतदान सुरू होते. सकाळी १० वा. ३० टक्के, १२ वा. ५० टक्के, तर अडीच वा. ७० टक्के मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह जाधव, तहसीलदार किशोर घाडगे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव, पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, सहायक निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह कार्यकारी संचालक विजयसिंह औताडे, सेक्रेटरी एस. ए. कांबळे, अजित कुलकर्णी आदींसह अधिकारी, कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)मतमोजणी आज चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. १२ पैकी ११ जागांसाठी मतदान झाले आहे. आज, बुधवारी सकाळी आठ वाजता कारखाना कार्यस्थळावर गोडावूनमध्ये मतमोजणीस प्रारंभ होईल. १६ टेबलांवर एकाचवेळी ही प्रक्रिया सुरू होणार असल्याने दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होईल. अपक्ष सदाशिव तेलवेकरांना किती मते मिळणार? याची उत्सुकता आहे.