शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेतील जिल्हा परिषद मतदारसंघाची पुनर्रचना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:50 IST

ज्या गावचे रहिवाशी आहोत त्या समावेश असलेल्या गावांतूनच जिल्हापरिषद किंवा पंचायत समिती लढवण्याचा आनंद कार्यकर्त्यांना मिळणार

आयुब मुल्ला -- खोची -हातकणंगले तालुक्यातील शिरोली व हुपरी गावांना नगरपंचायत होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हापरिषद मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. यातून ही दोन गावे वगळल्याने किमान एकतरी मतदारसंघ कमी होईल. अकरा ऐवजी दहा मतदार संघ होतील. साहजिकच पुनर्रचनेचा फायदा गृहीत धरून मतदारसंघाचे आखाडे बांधले जात आहेत. इच्छुकांनी त्यादृष्टीने जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे अकरा जिल्हा परिषद मतदारसंघ हातकणंगले व करवीर तालुक्यात आहेत. त्यामुळे प्रमुख पदाधिकारी होण्यात याच तालुक्यातील कार्यकर्ते अग्रेसर असतात. पण या दोन्ही तालुक्यांची भौगोलिक रचना आता मतदारसंघामुळे बदलण्याची शक्यता आहे. जर हद्दवाढ झाली तर करवीरची रचनाच व्यापक प्रमाणात बदलेल पण सध्यातरी याबाबत ठोस असे काही दिसत नाही. याउलट हातकणंगले तालुक्यातील शिरोली, हुपरी या मोठ्या गावांना नगरपालिका मंजुरीचे संकेत शासनाने दिले आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच तसा निर्णय होणार आहे, असे समजते. त्यामुळे सर्वच पक्षांचे इच्छुक आपल्या सोयीनुसार मतदारसंघ कसा बसेल अशी प्राथमिक चर्चा करू लागले आहेत. दहा वर्षांपूर्वी झालेल्या पुनर्रचनेमुळे बहुतांश प्रस्थापितांची अडचण झाली होती. आपला हक्काचा मतदारसंघ सोडून दुसरीकडून निवडणूक लढवावी लागली. परंतु आता मात्र, पुन्हा पुनर्रचना होणार हे निश्चित आहे. आपण ज्या गावचे रहिवाशी आहोत त्या समावेश असलेल्या गावांतूनच जिल्हापरिषद किंवा पंचायत समिती लढवण्याचा आनंद कार्यकर्त्यांना मिळणार आहे.त्यामुळे जुन्या जनसंपर्काचा, गटाच्या बांधणीचा, पक्षीय प्रभावाचा उपयोग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्वीसारखे पक्षीय राजकारण असेलच परंतु नेत्यांच्या बिघाडीमुळे स्वतंत्र आघाड्याही निर्माण होतील. यामध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते असतील. भक्कम आघाडी तालुक्याच्या पश्चिम भागात बांधण्याचे काम किंबहुना चाचपणी सुरू आहे. चर्चाही सुरू आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पक्षीय संघर्षाबरोबरच आघाडीतही निवडणुकीच्या लढाई होणार आहेत.