इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेत इयत्ता दहावी व बारावीनंतरचे मान्यताप्राप्त कोर्स सुरू झाले आहेत. हे कोर्स शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पाटील यांनी केले आहे.
बारावी सायन्सनंतर बॅचरल ऑफ सायन्स, क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स, बारावी वाणिज्यसाठी बॅचरल ऑफ कॉमर्स, दहावीनंतर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निक यांसह नर्सिंग स्कूल व पॅरामेडिकल कोर्सेस सुरू आहेत. रेडिओलॉजी टेक्निशियन, नेत्र रोगतज्ज्ञ, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, हेल्थ असिस्टंट (आठवी उत्तीर्ण) साठी असे विविध मान्यताप्राप्त कोर्स सुरू झाले असून, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमार्फत संपूर्ण फी माफ केली जाते, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
चौकट
शस्त्रक्रियेची सुविधा
संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी, सिझेरियन, मूतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, लहान मुलांची शस्त्रक्रिया, हाडांची शस्त्रक्रिया, आदी २४ तास सुरू आहेत.