शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्ग दुहेरीकरणास मान्यता

By admin | Updated: May 26, 2016 00:22 IST

कामास सुरुवात होणार : ३ हजार ६२७ कोटींच्या अपेक्षित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची मंजुरी

नवीदिल्ली/सांगली/मिरज : रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या पुणे-मिरज-लोंढा या ४६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी तीन हजार ६२७ कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने बुधवारी मान्यता दिली. मिरज-पुणे दुहेरीकरणाच्या कामाची निविदा काढण्यात आल्याने दुहेरीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे मिरजेतून केवळ चार तासांत पुण्याला पोहोचता येणार आहे. मिरज-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याने या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यास मिरजेतून पुणे, मुंबई प्रवास जलद व सोयीचा होणार आहे. लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या दुहेरीकरणाची अनेक वर्षांची मागणी आहे. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी अर्थिक तरतूद करण्यात आल्याने कामास गती मिळाली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने पुणे ते मिरज दरम्यान दुहेरीकरणाच्या कामाची तीन टप्प्यात निविदा प्रसिद्ध केली असून तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाची निविदा दक्षिण-पश्चिम रेल्वेने काढली आहे. लोंढा-मिरज-पुणे या दुहेरीकरणासाठी ३ हजार ६२७ कोटी रूपये खर्चास बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने दुहेरीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर विद्युतीकरणाच्या कामाची स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात कोल्हापूर- मिरज- पुणे या २८० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी ३२६ कोटी रूपये व मिरज-लोंढा या १८९ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी २०८ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्'ातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही गेल्या चाळीस वर्षात महालक्ष्मी, सह्याद्री व कोयना या तीनच एक्सप्रेस प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या हमसफर, तेजस व उदय या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या वातानुकूलित व सुपरफास्ट एक्स्प्रेस कोल्हापूर-मिरज- मुंबई मार्गावर सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे. असे होणार दुपदरीकरणपुणे-मिरज-लोंढा मार्ग एकूण ४६७ किलोमीटरचा आहे. याच्या दुपदरीकरणासाठी पाच वर्षांचा कालावधी गृहीत धरण्यात आला असून, एकूण खर्च ३ हजार ६२७ कोटी ४७ लाख रुपये अपेक्षित आहे. प्रतिवर्षी पाच टक्के साहित्य दराच्या वाढीचा विचार करून हा खर्च ४ हजार २४६ कोटी ८४ लाख गृहीत धरला आहे.कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाची प्रतीक्षाकऱ्हाड-चिपळूण व कोल्हापूर-वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गाचे अद्याप सर्वेक्षण सुरू आहे. नवीन रेल्वेमार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडला जाणार असल्याने कोकणाला जोडणाऱ्या नवीन रेल्वेमार्गाची प्रतीक्षा सुरू आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या दुपदरीकरणासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो. प्रभू यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली होती. या मार्गाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यातील प्रवाशांना होणार आहे. मिरज-लोंढा मार्गावर सांगली, कऱ्हाड आणि सातारा ही महत्त्वाची स्थानके आहेत.- संजयकाका पाटील, खासदार, सांगली