शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या प्रवेशव्दारातील स्वागत कमान महापालिकेकडे हस्तांतरित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

या स्वागत कमानीवर असलेल्या जाहिरातीचे फलक पाहून कोल्हापुरातील विविध सामाजिक, तालीम संस्थांनी महापालिका प्रशासनाला निवेदने देऊन, तर काही नागरिकांनी ...

या स्वागत कमानीवर असलेल्या जाहिरातीचे फलक पाहून कोल्हापुरातील विविध सामाजिक, तालीम संस्थांनी महापालिका प्रशासनाला निवेदने देऊन, तर काही नागरिकांनी सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून या कमानीची माहिती घेतली. त्यानंतर आयुक्त आणि या कमानीवरील जाहिरातीचे ठेकेदार असलेल्या भारती एक्स्पो ॲड‌्स या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या जाहिरात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरकरांच्या भावनांचा आदर करत संबंधित कमान महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास सकारात्मक दर्शविली. त्यानुसार त्यांनी या कमानीवरील जाहिरात फलक हटवून त्याठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहूनगरीत सहर्ष स्वागत असा फलक लावला असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. कोल्हापूरकरांच्या भावना आणि आमदार जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही कमान हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याचे भारती एक्स्पो ॲड‌्सचे संचालक मानस मंडलिक यांनी सांगितले. या कमानीबाबत महापालिका आणि संबंधित जाहिरात संस्थेमध्ये करार झाला होता. त्यानुसार कमानीची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी, वीज बिल, आदींची जबाबदारी या संस्थेवर होती. त्याबदल्यात त्यांना कमानीवर जाहिरात करण्याची परवानगी महापालिका प्रशासनाने दिली असल्याचे महापालिकेचे इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले.

चौकट

सुशोभिकरणाबाबत आठ महिन्यांपूर्वी चर्चा

शहराची ओळख असलेल्या या स्वागत कमानीवरील जाहिरात कमी करणे. या कमानीचे ऐतिहासिक दगडी स्वरूपात सुशोभिकरणासह कमानीपासून महाराणी ताराराणी चौकापर्यंतच्या मार्गाच्या सौंदर्यकरणाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत आठ महिन्यांपूर्वी चर्चा केली आहे. पालकमंत्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि मी कोल्हापूरला पुढे नेण्याच्या दृष्टीने कार्यरत असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

फोटो (२५०६२०२१-कोल-स्वागत कमान) : कोल्हापूर शहराच्या प्रवेशव्दारातील स्वागत कमानीवर शुक्रवारी भारती एक्स्पो ॲड‌्स या संस्थेने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शाहूनगरीत सहर्ष स्वागत’ असा फलक लावला.

===Photopath===

250621\25kol_5_25062021_5.jpg

===Caption===

फोटो (२५०६२०२१-कोल-स्वागत कमान) : कोल्हापूर शहराच्या प्रवेशव्दारातील स्वागत कमानीवर शुक्रवारी भारती एक्स्पो ॲडस या संस्थेने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत  ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शाहूनगरीत सहर्ष स्वागत’ असा फलक लावला.