शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सभापती पदावरून काँग्रेसमध्ये बंडखोरी

By admin | Updated: January 25, 2017 00:44 IST

महिला व बालकल्याण समिती : ‘स्थायी’च्या पॅटर्नची पुनरावृत्ती

सांगली : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी सत्ताधारी काँग्रेसमधून दोन अर्ज दाखल झाले आहेत. उपमहापौर गटाने स्वतंत्र अर्ज भरल्याने बंडखोरीची शक्यता अधिक आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडीच्या पॅटर्नचीच यावेळीही पुनरावृत्ती होणार, की काँग्रेसमधील वाद मिटणार, याचा फैसला बुधवारी होणार आहे.महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. या कालावधित काँग्रेसमधील मदनभाऊ गटाकडून विद्यमान सभापती गुलजार पेंढारी, उपमहापौर गटाकडून सुनीता खोत, तर विरोधी राष्ट्रवादीकडून प्रियंका बंडगर, असे तीन अर्ज दाखल झाले. सकाळपासूनच महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली होती. दुपारी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोघांचे अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. दुसरीकडे उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी महापौरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या गटातून सुनीता खोत यांचा अर्ज भरण्यात आला. या अर्जावर स्वाभिमानी आघाडीच्या संगीता खोत यांना सूचक करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रियंका बंडगर यांना रिंगणात उतरविले असले तरी, उपमहापौर गट व स्वाभिमानीशी आघाडी झाली तरच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभापती निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)...तर आम्ही किंगमेकर महापौर शिकलगार यांनी पेंढारींची समजूत काढून, सुनीता खोत यांना सभापती करण्याचा शब्द दिला आहे. तो शब्द त्यांनी पाळावा. सभापती उपमहापौर गटाचा होईल अथवा आम्ही या निवडणुकीत किंगमेकर ठरू, असा दावाही माने यांनी केला. तसेच शिकलगार यांनी, असा कुठलाही शब्द आपण दिला नसल्याचे स्पष्ट केले.