शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर गटाला अल्टिमेटम

By admin | Updated: November 15, 2016 00:22 IST

विधानपरिषद निवडणूक : आदेशाबाबत विशाल पाटील गटाचे मौन

सांगली : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीतील बंडखोर विशाल पाटील गटास अल्टिमेटम दिला आहे. मंगळवारपर्यंत त्यांनी आदेशाचे पालन केले नाही, तर शहर जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत विशाल पाटील गटाने कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी शिष्टाई करूनही या गटाने कोणाचेही ऐकले नाही. रविवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना बंडखोरी थांबवून कदम यांना पाठिंबा जाहीर करण्याचे आदेश पाटील यांना दिले होते. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला होता. त्यामुळे विशाल पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले शेखर माने कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारपर्यंत पक्षांतर्गत संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र चव्हाण यांच्या आदेशाचा कोणताही परिणाम झाला नाही. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सोमवारी विशाल पाटील गटाच्या हालचालींची माहिती घेतली. मंगळवारी सकाळपर्यंत त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला नाही, तर त्यासंदर्भातील स्थानिक कॉँग्रेस कमिटीचा अहवाल घेऊन कारवाई करण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला आहे. सोमवारी दिवसभर या गटाने बंडखोरी थांबविण्याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. बंडखोरी कायम ठेवण्याच्या ते तयारीत असल्याने पक्षाकडून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीकडून खेळ्याकॉँग्रेसमधील बंडखोरीला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीने सांगलीतील एका पदाधिकाऱ्यावर जबाबदारी सोपविली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीनंतर रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या या स्थानिक नेत्याने बंडखोर गटाशी संपर्क साधल्याचे समजते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीवेळीही राष्ट्रवादीच्या याच नेत्याने शेखर माने यांच्याशी सातत्याने संपर्कठेवला होता.