शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

निवडणूक ‘अर्थ’कारणाने गाजण्याचे संकेत

By admin | Updated: April 13, 2016 00:54 IST

इचलकरंजी नगरपालिका : राजकीय पक्षात उदासीनता; श्रेष्ठींमध्ये अस्वस्थता

इचलकरंजी : नगरपालिकेची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली असली तरी सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमालीची शांतता आहे. आगामी निवडणूक राजकारण किंवा समाजकारणाऐवजी ‘अर्थ’कारणानेच गाजणार, असे संकेत मिळत असल्याने सध्याची उदासीनता भासत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींमध्ये काहीशी अस्वस्थताही आहे.शहरामध्ये कॉँग्रेसचे वर्चस्व असले तरी पूर्वीपासूनच स्थानिक पातळीवर गटबाजीचे राजकारण आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उदयापासून तोही पक्ष येथे चांगला प्रभावी आहे. याशिवाय भाजप, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आदी पक्षसुद्धा त्यांची ताकद आणि दबदबा राखून आहेत. मात्र प्रकाश आवाडे (कॉँग्रेस) विरोधकांची एक आघाडी असून, तिला शहर विकास आघाडी असे नाव आहे. तीमध्ये भाजप, शिवसेना, दोन्ही कॉँग्रेसमधील बंडखोरांची मोट असून, ती आमदार सुरेश हाळवणकर यांनी बांधली आहे.इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुका होताना कॉँग्रेस आणि कॉँग्रेस विरोधक एकत्रितपणे असे येथील राजकारणातील नित्याचेच स्वरूप आहे. त्याला अपवाद गतवेळची सन २०११ मधील निवडणूक ठरली. या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी व ‘शविआ’ असा तिरंगी सामना रंगला. तेव्हा तत्कालीन कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक मंत्र्यांनी त्यांच्या-त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. तशा ‘शविआ’साठी काही भाजपच्या नेत्यांनीही प्रचार सभा घेतल्या होत्या.अशा पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत नगरपालिकेतील एकूण ५७ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवक कॉँग्रेसचे, १० नगरसेवक राष्ट्रवादीचे व १७ नगरसेवक ‘शविआ’चे निवडून आले होते. निवडणुकीनंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांनी आघाडी करीत पालिकेत सत्ता स्थापन केली. मात्र, जानेवारी २०१५ मध्ये कॉँग्रेसच्या नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला नाही. बंड केले आणि नगराध्यक्षांच्या बंडाला पालिकेतील विरोधी ‘शविआ’ने पाठिंबा दिला. त्याचा परिणाम म्हणून गेले वर्ष पालिकेतील राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत. त्याचप्रमाणे आता आगामी निवडणूक ही ‘अर्थ’कारणावर अवलंबून असेल, असे अनेक राजकीय क्षेत्रांतील अनेकांचे मत आहे. (प्रतिनिधी)नगराध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंगआगामी नगराध्यक्षपद मागासवर्गीय जातीसाठी आरक्षित आहे. त्याचीही तयारी काहींनी आतापासूनच सुरू केली असून, ‘माझ्याशिवाय हाय कोण’ अशी त्यांची भूमिका आहे. तसे उपक्रमसुद्धा राबविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे, तर एका माजी लोकप्रतिनिधीने शेजारच्या विधानसभा मतदारसंघातून इचलकरंजी शहरात नावनोंदणी करण्याचा खटाटोप सुरू केला आहे.इच्छुकांची भाऊगर्दीनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या पातळीवर उदासीनता असली तरी शहरातील काही प्रभागांतील इच्छुकांनी विविध नागरी सेवा-सुविधांच्या मागणीच्या नावाखाली आंदोलने सुरू केली आहेत. अशा आंदोलनातून आपण ‘भावी नगरसेवक’ असल्याच्या अविर्भावात नेतृत्व करीत भाषणबाजीसुद्धा चालू केली आहे. अशा आंदोलनांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून गटार बांधणीपर्यंत समस्या मांडल्या जात आहेत.