या योजनेत कोल्हापूर विभागातून १२३ जणांनी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ४५ टक्के कर्मचाऱ्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, विविध व्याधी आहेत, तर २५ टक्के कर्मचाऱ्यांची एक ते चार वर्षे सेवा उरली आहे. महामंडळाची परिस्थिती पाहता निवृत्तीनंतरचे देय रकमा मिळणे कठीण होईल. त्याअगोदरच आपण या योजनेचा लाभ घ्यावा, अशी मन:स्थिती आहे. मुले मोठी झाली. नोकरी करतात, आता आपल्याला अशा पद्धतीची दगदगीची नोकरी नको म्हणून १० टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित सेवेत कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून धडधाकट आहोत, तोपर्यंत नोकरी सोडून अन्य व्यवसाय करण्याकडे १५ टक्के कर्मचाऱ्यांचा कल आहे. महामंडळाने आपल्याला मोठा हात देऊन आपला संसार उभा केला. आता स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून त्याच पगारात नव्या दोन कर्मचाऱ्यांचा पगार भागेल, महामंडळाला मदत होईल, अशी भावना ठेवून निवृत्ती स्वीकारणाऱ्यांमध्ये पाच टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पाॅईंटर
जिल्ह्यातील आगार - १२
कर्मचारी संख्या - ४८००
पन्नाशी ओलंडलेले कर्मचारी -५५०
कर्मचाऱ्यांचा पगार- १८ हजार ते ४५ हजार
अधिकाऱ्यांचा पगार - ३० ते ६५ हजार
चौकट
स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास लाभ काय मिळणार?
उर्वरित सेवेच्या प्रतिवर्ष तीन महिन्यांचा मूळ पगार, महागाई भत्ता अशी नुकसानभरपाई मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबांकरिता मोफत प्रवासी पास, निवृत्तीनंतरची नियमित देयके असा लाभ मिळणार आहे.
चौकट
अल्प प्रतिसाद
आपल्या निवृत्तीनंतर पाल्यांना महामंडळात नोकरीस घ्यावे. नुकसानभरपाई म्हणून किमान सहा ते आठ महिन्यांंचा पगार द्यावा. महामंडळाची नाजूक बनलेली आर्थिक स्थिती, ही नोकरी गेल्यानंतर पुढे काय करायचे असा प्रश्न आहे. त्यामुळे अनेकजण यासाठी पात्र असूनही ही योजना स्वीकारण्यास राजी नाहीत.
कोट
महामंडळाने भरभरून दिले आहे. आता परतफेड म्हणून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला.
उदयसिंग घाटगे, लिपिक,
कोट
आपल्या पतीनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आपल्याकडे उदरनिर्वाह करण्यास अन्य साधन आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे.
- हेमलता घाटगे, पत्नी
फोटो : ०३०१२०२१-कोल-घाटगे
ओळी : राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करणारे उदयसिंग घाटगे, आई, वडील, मुलगा, मुलगी, पत्नी आणि भावासोबत.