शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मद्यसाठा रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज लोकसभा निवडणूक पार्श्वभूमी : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:56 IST

आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच आतापासूनच जिल्ह्यात गोव्याहून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिन्याभरात डझनभर

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच आतापासूनच जिल्ह्यात गोव्याहून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिन्याभरात डझनभर कारवाया करून लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या चारी सीमांवर (बॉर्डर) करडी नजर ठेवत विशेष भरारी पथकांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विभागीय उपायुक्त यशवंत पवार आणि अधीक्षक गणेश पाटील यांनी यासंदर्भात नुकतीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कठोर कारवाईच्या सूचना केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे; त्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी गल्ली-बोळांत, गावा-गावांत दारूचे बॉक्स पोहोच करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने वातावरण तापू लागले आहे. गतवर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला होता. लोकसभा निवडणूक चुरशीची होत असल्याने दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने ती रोखण्याचे मोठे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.

विभागीय उपायुक्तयशवंत पवार आणि अधीक्षक गणेश पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून येणाºया चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारूचे दर कमी असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील पंटरांचा या ठिकाणाहून ट्रक भरून मद्यसाठा आणण्याची तयारी असते; त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची, विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले.हातभट्टीची धग कायमशहरालगतच्या उपनगरांसह ग्रामीण भागात गावठी हातभट्ट्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग वारंवार कारवाई करूनही या हातभट्ट्यांची धग कायम सुरूआहे. गावागावांत बेकायदेशीर देशी-विदेशी दारूंचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. या सर्व बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर छापे टाकण्याची तयारी पथकांनी केली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारूची तस्करी रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. छुप्या मार्गाने दारूची वाहतूक करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल.- गणेश पाटील, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर