शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिकरूपी विचारांचे ‘वैभव’ जिल्ह्याला देण्यासाठी सज्ज रहा- सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:10 IST

म्हाकवे : लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे कर्तृत्ववान नेतृत्व जिल्ह्याबरोबरच महाराष्टÑाला मिळाले आहे. त्यांच्या आदर्शवत पायवाटेवर मार्गक्रमण करत विकासाच्या दिशेने वाटचाल करूया.

ठळक मुद्दे मंडलिक कारखाना कार्यस्थळावर स्नेहमेळावाविकासासाठी एकसंघ रहा व पराजयाने खचून न जाता आणि विजयानंतर हुरळून न जाता जनसामान्यांच्या कामांना महत्त्व द्या.

म्हाकवे : लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे कर्तृत्ववान नेतृत्व जिल्ह्याबरोबरच महाराष्टÑाला मिळाले आहे. त्यांच्या आदर्शवत पायवाटेवर मार्गक्रमण करत विकासाच्या दिशेने वाटचाल करूया. ते आयुष्यभर वैचारिक लढाई करत त्यांनी लढाऊपणा जोपासला आहे. त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊया. तसेच आगामी निवडणुका २०१८ मध्ये होऊ द्या किंवा २०१९ मध्ये होऊ द्या. जिल्ह्याचे गतवैभव परत आपल्याकडे आणण्यासाठी सर्व ताकदीनिशी सज्ज राहूया असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले.

हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर कारखाना सभासद, शेतकरी, कर्मचारी व कार्यकर्ते यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रा. संजय मंडलिक होते.स्व. मंडलिकांच्या कार्यकर्तृत्व आणि गौरवशली कारकिर्दीची आठवण करून देत आ. पाटील म्हणाले, स्व. मंडलिकांना राजकीय संघर्ष हयातभर करावा लागला. लढाईतच माणूस जिवंत राहतो. त्यामुळे संघर्षाने कधी खचून जायचे नाही. हा त्यांचा मूलमंत्र सर्व कार्यकर्त्यांनी अंगीकारला.

मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्राचार्य जीवन साळोखे यांना केले. यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, संचालक विरेंद्र मंडलिक, सौ. वैशाली मंडलिक, कागलच्या सभापती सौ. विमल पाटील, प्रकाशराव पाटील, नंदूभाऊ पाटील (बिद्री), शेखर सावंत (बानगे), देवानंद पाटील (निढोरी), आनंद मोरे, रघुनाथ सिरसे (सावर्डे बुद्रुक), सौ. राजश्री चौगुले, विश्वास कुराडे आदी उपस्थित होते. अविनाश चौगुले यांनी आभार मानले.कागलमध्ये शिवसेनेचे ११ सरपंच : मंडलिककागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत अत्यंत गुंतागुंतीचे राजकारण निर्माण झाले. कोणत्या गटाला किती जागा मिळाल्या या संख्याबळात अडकून न पडता गावच्या विकासासाठी एकसंघ रहा व पराजयाने खचून न जाता आणि विजयानंतर हुरळून न जाता जनसामान्यांच्या कामांना महत्त्व द्या. मागल तालुक्यामध्ये मंडलिक व संजयबाबा घाटगे गट शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्रित आहेत. त्यामुळे कागल तालुक्यात शिवसेनेचे २६ पैकी ११ सरपंच निवडून आल्याचेही शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. मंडलिक यांनी सांगितले.