कोल्हापूर : ‘लोकमत’ ने अकराव्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल कोल्हापूरकर..’ या खास विशेषांकाचे समाजातून उत्स्फूर्त स्वागत झालेच परंतु जिल्ह्णांतील अनेक शाळा व हायस्कूलमधून त्याचे प्रार्थनेच्यावेळी सामूदायिक वाचन करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्णांतील तरुणांची गुणवत्तेची भरारी नव्या पिढीला समजावी यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. हा विशेषांक म्हणजे नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहेच शिवाय या मुलांच्या पाठीवर कौतुकाची कोल्हापुरी थाप मारणारी आहे, अशा भावना ‘लोकमत’कडे अनेकांनी व्यक्त केल्या. वर्धापनदिन दिनानिमित्त गेल्या काही वर्षांत ‘लोकमत’ने अत्यंत दर्जेदार विशेषांक प्रसिद्ध केले आहेत. ‘सह्णाद्रीचा वारसा’ या विशेषांकाचे ‘लोकमत’तर्फे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. सह्णाद्रीतील जैवविविधतेची आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची अतिशय सुलभ व अधिकृत माहिती देणारे मराठीतील हे एकमेव पुस्तक आहे. त्यानंतरच्या काळात ‘कोल्हापुरी राजकारण’, ‘कोल्हापुरी कला’ हे विशेषांक प्रसिद्ध झाले. हे विशेषांकही लवकरच पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध होत आहेत. त्याचेही वाचकांनी भरभरून कौतुक केले. त्याच परंपरेचा पुढचा टप्पा म्हणून यंदा ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ हा विशेषांक १९ फेब्रुवारीपासून रोज प्रसिद्ध होत आहे. हा विशेषांक ‘लोकमत’ च्या इंटरनेट आवृत्तीवरही (ँ३३स्र://ीस्रंस्री१.’ङ्म‘ें३.ूङ्मे/ीस्रंस्री१ें्रल्ल.ं२स्र७?०४ी१८ी=ि134) या ंिलंकवरही उपलब्ध आहे. गणेशवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजमध्ये या विशेषांकातील लेखांचे रोज वाचन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सोमवारपासून आणखीही काही शाळांत हा उपक्रम सुरू होत आहे. ‘जगात भारी कोल्हापुरी..’ असे म्हटले जाते व त्याचा कोल्हापूरकरांना अभिमान आणि गर्वही आहे, परंतु हे जगात भारी नुसते म्हणण्यापुरतेच मर्यादित नसून, प्रत्यक्षातही जगाच्या कानाकोपऱ्यांत कोल्हापुरी माणसाने आपल्या कर्तृत्वाचा अवीट ठसा उमटविला आहे. त्याची यशोगाथाच या विशेषांकामध्ये प्रसिद्ध झाली आहे. ‘लोकमत’ने त्याचा वेध घेतला असता कोल्हापूर हे खऱ्या अर्थाने ग्लोबल झाल्याचेच प्रत्यंतर त्यातून आले. तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी पायताण, पिवळाधमक जिभेवर विरघळणारा गूळ आणि लहरी फेटा अशी आमच्या कोल्हापूरची देदीप्यमान परंपरा.. परंतु कोल्हापुरी माणूस म्हणजे तेवढेच नाही. त्याची आताची झेप त्या पलीकडेही आहे. विदेशात जाऊन महत्त्वाच्या पदांवरील नोकरी मिळवणे ही तशी साधी सोपी गोष्ट नाही. त्यामागे त्या सर्वांचे कष्ट आहेत. कारण ही संधी त्यांना फक्त आणि फक्त गुणवत्तेवर मिळाली आहे. एकेकाळी शिवाजी विद्यापीठाच्या पदवीधरांना नोकरीवर घेताना नाक मुरडणाऱ्यांच्या डोळ््यात झणझणीत अंजन घालणारी वाटचाल कोल्हापूरच्या तरुणाईने केली आहे. फक्त शहरातीलच मुले या स्पर्धेत पुढे आहेत असेही नाही. खेड्या-पाड्यांतील मुलेही आत्मविश्वासाने व जिद्दीने विदेशात करिअर करत असल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र त्यातून पुढे आले आहे. एकट्या राजारामपुरी परिसरातीलच सुमारे १२१ तरुण अटलांटा शहरात सॉफ्टवेअर कंपन्यांत नोकऱ्या करत आहेत. अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, डेन्मार्क, चीन, जर्मनीपासून नायजेरियापर्यंत देश कोणताही असो, तेथील भाषा, भोजनाची अडचण मागे टाकून कोल्हापूरचा तरुण महत्त्वाच्या पदांवर उत्तम पद्धतीने काम करत आहे. तो संधी मिळण्याची वाट पाहत बसलेला नाही. संधी शोधत तो जगाच्या दुसऱ्या टोकाला गेला आहे. खरंतर हा कोल्हापूरच्या मातीचा उपजत गुणच म्हटला पाहिजे. कोल्हापुरी माणूस ‘असेल हरी तर आणून देईल खाटल्यावरी..’ या मनोवृत्तीचा नाही. तो विजिगीषू वृत्तीचा व उद्यमी आहे. कोल्हापूरचा म्हणून जो विकास झाला आहे, त्याचे महत्त्वाचे कारण इथल्या माणसाच्या मनोवृत्तीत आहे. तो लढणारा, झुंजणारा आहे. ‘लाथ मारीन, तिथे पाणी काढीन,’ अशी धमक बाळगणारा आहे. हे सळसळते रक्तच त्याला कधीच स्वस्थ बसूच देत नाही. त्याची झलकच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल कोल्हापूर’च्या पाना-पानांवर वाचायला मिळते. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेला हा विशेषांक नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. आपण ‘कोल्हापुरी म्हणजे जगात भारी’ असे म्हणतो, परंतु तो का जगात भारी आहे, याची गाथा म्हणजेच हा विशेषांक आहे म्हणूनच त्याचे कौतुक होत आहे.
‘ग्लोबल कोल्हापूरकर’चे शाळा-शाळांमधून वाचन
By admin | Updated: August 23, 2015 18:05 IST