शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाऱ्यांवर पुन्हा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 01:02 IST

शहरात पोलिस प्रशासनाची मोहीम : हजार वाहनांकडून दोन लाखांचा दंड वसूल

कोल्हापूर : शहरात वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. सोमवारी अशाच प्रकारे मोहीम राबविण्यात आली. यावेळी बहुतांशी वाहनधारकांनी नियमांचे पालन करत झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी न करता पाठीमागे केली. वाहनधारकांच्यात झालेल्या परिवर्तनामुळे पोलिस प्रशासनाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दिवसभरात हजार वाहनांवर कारवाई करून दोन लाख रुपये दंड वसूल केल्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. वाहनांची संख्या वाढल्याने शहरासह उपनगरांत वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे विदारक चित्र आहे. त्यानुसार शहरात सोमवारी मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली. कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या वाहनचालकांना जाग्यावर २०० ते १ हजार रुपये दंडाची पावती दिली गेली. दि. १७ व १८ एप्रिलला केलेल्या कारवाईची वाहनधारकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. बहुतांशी वाहनधारकांनी झेब्रा क्रॉसिंग पाठीमागे वाहने थांबवून नियमांचे पालन केले. या कारवाईमध्ये दीडशे पोलिसांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)पेठवडगावात २२ हजार दंड वसूलपेठवडगाव : शहरातील प्रमुख चौकात बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत १११ वाहनधारकांकडून सुमारे २२ हजार २०० रुपये दंड वसूल केला. सोमवारी आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर १५ पोलिसांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलला. त्यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले.