शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

तमदलगे-अंकली ‘बायपास’ पुन्हा वादात

By admin | Updated: November 16, 2016 00:01 IST

शासनाचे धोरण कागदावरच : ‘शासकीय काम सहा महिने थांब’ याचा अनुभव, कोणत्याच उपाययोजना नाहीत

जयसिंगपूर : रस्ते चांगल्या दर्जाचे व खड्डेमुक्त करण्याचे धोरण शासनाकडून राबविले जात असताना सांगली-कोल्हापूर महामार्गावरील तमदलगे बसवान खिंड ते अंकली या बायपास रस्त्यावरील प्रश्न प्रलंबित आहेत. निमशिरगावच्या शाळा स्थलांतराचा प्रश्न, जैनापूर-चिपरी रस्ता, जयसिंगपूर रेल्वेस्थानकाजवळ रस्त्याची झालेली दुरवस्था अशा समस्यांच्या गर्दीत रस्ता सापडला असताना शासनाकडून कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येते. चार वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूर महामार्गाअंतर्गत तमदलगे बसवान खिंड ते अंकली रस्ता सुप्रीम कंपनीकडे वर्ग झाला होता. सध्या या मार्गावरील काम बंद आहे. जयसिंगपूर येथील रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जैनापूर येथे चौपदरीकरणांतर्गत कामच झालेले नाही. शिवाय निमशिरगावच्या शाळा स्थलांतराचा प्रश्नदेखील जैसे थेच आहे. रस्त्याचे काम सुरू असताना धुळीमुळे रस्त्याकडील शेतीपिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ‘शासकीय काम सहा महिने थांब’ याप्रमाणे गेली चार वर्षे रस्त्याचे काम सुरू होते. अर्धवट रस्त्याचे काम झालेले असतानादेखील सुप्रीम कंपनीकडून टोलनाका सुरू करण्याची घाई झाल्यानंतर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून या टोलला मोठा विरोध झाला. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तूर्ततरी टोलनाका व अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम ठप्प आहे. सुमारे ३४० कोटी रुपये या रस्त्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. ठेकेदार कंपनीकडून तमदलगे बसवान खिंड ते अंकली या मार्गावरील अर्धवट कामे झाली आहेत. अनेक समस्यांना या भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, अंकली टोलनाक्यापासून तमदलगेकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर ९०० मीटर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. २९ लाख ५० हजार रुपयांचा निधी रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर झाला आहे. सोमवारपासून ठेकेदाराने काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी) टोलनाक्याजवळ रस्त्याचे काम ४सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंकली टोल नाका ते बायपास मार्गावरील ९०० मीटरचा रस्ता केला जात आहे. ४सुप्रीम कंपनीच्या आराखड्यात हा रस्ता नसल्यामुळे शिवाय रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे २९ लाख रुपयांचा निधी या रस्त्यावर खर्च केला जात आहे. अभियान नावालाच एकीकडे शासनाकडून राज्यातील रस्ते चांगल्या दर्जाचे व खड्डेमुक्त करण्याचे धोरण राबविले जात आहे, तर दुसरीकडे गेल्या चार वर्षांपासून तमदलगे ते अंकली बायपास रस्त्यावर प्रश्नांची मालिका सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सुप्रीम कंपनीकडे बोट दाखविते. यामुळे शासनाचे खड्डेमुक्त अभियान नावालाच अशी परिस्थिती आहे. मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज जयसिंगपूर रेल्वेस्थानकाजवळील व चिपरी-जैनापूर रस्ता सुप्रीम कंपनी व बांधकाम विभागाच्या वादात अडकला आहे. अंदाजे ८०० मीटरच्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दानोळी, कोथळी, कवठेसार, उमळवाड, जैनापूर या गावांतील नागरिकांना सोयीस्कर असणारा हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे वाहतुकीस अडचणीचा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.