शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सव्वादोन लाख ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

कोल्हापूर : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहाेरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत ...

कोल्हापूर : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहाेरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश पडला आहे. पूरबाधित गावांपैकी २०६ गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून अजून १५ गावे पूर्णत: व ३७ अंशत: बाधित गावांतील वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.

महापुरामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिवाची बाजी लावून कर्मचारी पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. वीज नसल्याने गावगाड्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळावी, याकरिता पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करण्याबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी दिल्या होत्या. तसेच आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळाचाही पुरवठा केला होता. सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील ग्राहकांच्या भेटी घेऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यातील अडचणी व नेमका किती कालावधी लागू शकतो, ही वस्तुस्थिती ग्राहकांना अवगत करावी, असे सूचित केले.

चौकट

कोल्हापूर जिल्ह्यातील चार उपकेंद्रे (गांधीनगर, थावडे, आवाडे मळा, शिरदवाड) बंद आहेत. अद्याप १५ गावे पूर्णत: व ३० गावे अंशत: तेथील ३७ हजार ६३० घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजपुरवठा सुरळीत होणे बाकी आहे. १०१ वीजवाहिन्या पूर्ववत केल्या असून सात वीजवाहिन्या बंद आहेत. २८६५ वितरण रोहित्रे पूर्ववत केली असून अजून ४२६ बंद आहेत. उच्चदाब वीजवाहिनीचे १३६ व लघुदाब वाहिनीचे २१० वीज खांब पडले आहेत. नागाळा पार्क, पाटपन्हाळा व शिरटी या उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे.