शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘आरसी’ गुंडाळून चार कोटींचे साहित्य खरेदीचा ‘डाव’

By admin | Updated: January 19, 2016 00:48 IST

जिल्हा परिषदेचा कारभार : सायकल, शिलाई मशीन खरेदीत ढपला?

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर  शासनाचे दरपत्रक (आरसी) सोयीस्करपणे गुंडाळून ठेवत स्व-निधीतून सायकल, शिलाई मशीन, भांडी संच, मिरची कांडप संच असे तब्बल ३ कोटी ८९ लाख २३ हजार रुपयांच्या साहित्य खरेदीचा घाट जिल्हा परिषदेतील ‘कारभाऱ्यांनी’ घातला आहे. ‘आरसी’ला बगल दिल्यामुळे ‘ढपल्या’चा संशय बळावला आहे. बाजारपेठेतील नामांकीत कंपन्यांऐवजी ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ झालेल्यांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे. नामांकित कंपन्यांपेक्षा या कंपन्यांचे दरही जास्त आहेत. आज, मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यास निवडलेल्या तीनपैकी कमी किंमत असलेल्या कंपनीचे साहित्य खरेदी होईल. समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय मुलांना सायकल देण्यासाठी २० टक्के जिल्हा परिषद स्वनिधीतून ८० लाखांची तरतूद आहे. त्यासाठी प्रणोती एंटरप्रायजेस (सायकल किंमत - ५ हजार ६००), पार्श्व एनर्जी सोल्युशन्स ( ५ हजार ६४०), अर्णव सप्लायर्स (५ हजार ६८०) या कंपन्यांची निवड केली आहे. वीस टक्के स्वनिधीतून मागासवर्गीय मुलींना सायकल पुरविण्यासाठी ८५ लाख २३ हजारांची तरतूद आहे. निविदेनुसार सुनील ट्रेडर्स (सायकल किंमत- ३ हजार ७९५), प्रणोती एंटरप्रायजेस (५ हजार ६७०), पार्श्व एनर्जी सोल्युशन्स (६ हजार १००), अर्णव सप्लायर्स (६ हजार १३०) कंपन्यांची निवड केली आहे. वीस टक्के स्वनिधीतून मागासवर्गीय व्यक्ती व महिलांना शिलाई मशीन पुरवण्यासाठी ८० लाखांची तरतूद आहे. अणर्व सप्लायर्स (मशीन किंमत - ६ हजार ३००), पार्श्व एनर्जी सोल्युशन्स (६ हजार ३६०), परिक्षीत अ‍ॅग्रो टेक्निक्स (६ हजार ४१०) या शिलाई मशीनच्या कंपन्यांची निवड केली आहे. वीस टक्के स्वनिधीतून मागासवर्गीय वस्तीमधील समाजमंदिर, महिला बचतगटांना भांडी संच पुरवण्यासाठी ५५ लाखांची तरतूद केली आहे. यासाठी एव्हरेस्ट इंडस्ट्रीज (भांडी संच किंमत २७,५२२), ए. एस. ट्रेडिंग कंपनी (२९, ९९०), अर्णव सप्लायर्स (३०, १००), प्रणोती एंटरप्रायजेस (३०, १३०) या कंपन्यांची अनुक्रमे निवड झाली आहे. तीन टक्के अपंग निधीमधून मागासवर्गीय व्यक्ती, महिला, अपंग व्यक्तींना मिरची कांडप मशीन देण्यासाठी ८९ लाखांची तरतूद केली आहे. यासाठी श्री व्यंकटेश एंटरप्रायजेस (मिरची कांडप यंत्र -३३, ३००), परिक्षित अ‍ॅग्रो टेक्निक्स (३९९००), अर्णव सप्लायर्स (३९९७०), पार्श्व एनर्जी सोल्युशन्स (४०,०००) या कंपन्यांची निवड केली आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे या कंपन्यांची निवड केली आहे. ‘स्थायी’ची मान्यता; कारभाऱ्यांच्या हेतूवर संशययंदा स्थायी समितीमध्ये वैयक्तिक लाभासाठी साहित्य खरेदीचा विषय ठेवण्यात आला. गेल्यावेळी ज्यांनी आरसीचा आग्रह केला होता त्यांनी ‘सोयीची भूमिका’ घेत खुल्या पद्धतीने निविदा काढून साहित्य खरेदीला मान्यता दिली. आरसी असताना निविदा काढून साहित्य खरेदी नियमबाह्य आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘आरसी’नुसारच खरेदी करावी, असे सूचित केले आहे; पण बहुतांशी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी ‘आरसी’ नको, अशी भूमिका घेतली आहे. खुल्या निविदेने खरेदी करतानाही नामांकित कंपन्यांचे साहित्य घेण्याची संधी होती, पण तसे न करता ‘ढपल्या’ला हिरवा कंदील दिलेल्या कंपनीचे साहित्य घेण्याचा घाट आहे. ज्या कंपन्या निवडल्या आहेत त्यातील बहुतांशी कंपन्यांचे साहित्याचे दर कंपनीपेक्षा अधिक आहेत म्हणूनच ‘कारभाऱ्यां’च्या हेतूवर संशय ठळक होत आहे म्हणून हा विषय सभेत वादळी ठरणार आहे.