शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राऊतवाडी धबधबा विकासाचा कच्चा आराखडा

By admin | Updated: October 4, 2016 00:59 IST

धबधब्यावरील आनंद लुटल्यानंतर कारिवडे मार्गे व्हाया दाजीपूर अभयारण्याचे भ्रमण करून निसर्गाचा आनंद घेत प्राण्यांना न्याहाळता येईल.

सोळांकूर : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राधानगरी वन्यजीव विभाग व स्थानिक वन समित्या यांच्या पुढाकाराने राऊतवाडी धबधब्यावर मनोरे, पार्किंग झोन, बालोद्योन, हॉटेल्स, चेजिंग रूम, प्रसाधनगृहे उभा करण्यासाठी धबधब्याचा पर्यावरणपूरक कच्चा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटकांना धबधब्यासह हत्तीमहल, बेनजीर व्हिला, दाजीपूर, अभयारण्य, हसणे प्रकल्पावरील बोटिंगचा लवकरच आनंद लुटता येणार आहे. गेल्या चार वर्षांत राऊतवाडी, रामणवाडी, सोळांकूर येथील धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. राऊतवाडी धबधब्यानजीक जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. आराखड्यानुसार मुख्य रस्ता चांगला करून धबधब्यावरील मार्ग, सिमेंट पायऱ्या, छोटेसे तळे बनवून धबधब्यावरील कडा पाहण्यासाठी उंच मनोरे उभे केले जाणार आहेत. पाण्याचा आनंद लुटल्यानंतर स्त्री-पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र चेजिंग रूम, पार्किंग झोन, प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बालोद्यान, छोटासा बगीचा देखील बनविण्याची संकल्पनेचा आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.सध्या हत्तीमहल व बेनजीर व्हिला या ऐतिहासिक वास्तू पाटबंधारे विभागाकडे आहेत. त्या वस्तू वनविभागाकडे देण्यात याव्यात, अशी मागणी संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे. धबधब्यावरील आनंद लुटल्यानंतर कारिवडे मार्गे व्हाया दाजीपूर अभयारण्याचे भ्रमण करून निसर्गाचा आनंद घेत प्राण्यांना न्याहाळता येईल. त्यानंतर पर्यटकांना हसणे प्रकल्पाकडे बोटिंग प्रवास व स्विमिंगचा आनंद लुटता येणार आहे. ठिकठिकाणी हॉटेल्स्, रेस्टॉरंट, निवासस्थाने उभी करण्याची संकल्पना आराखड्यामध्ये नमूद करण्यात आली आहे. लवकरच राऊतवाडी धबधब्याचा नवा लूक पाहण्याची उत्कंठा पर्यटक व पर्यावरणप्रेमींना लागली आहे. हा विकास पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनीही सहभाग दर्शवावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत. (वार्ताहर)